Pakoda Seller Viral Video: लोकांचे आरोग्य धोक्यात? उकळत्या तेलात टाकल्या प्लास्टिक पिशव्या, स्ट्रीट फूड विक्रेत्याचं नको ते कृत्य

Pakoda Seller Viral Video: लुधियानातील ब्रेड पकोडा विक्रेत्याचा तेल ओतण्याचा अनोखा पण धोकादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोग्यधोके आणि मायक्रोप्लास्टिकवर चर्चा रंगली आहे.
 Viral Video
Pakoda Seller Viral VideoSaam Tv
Published On

पंजाबच्या लुधियानामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पकोडा स्टॉलवरील आहे. व्हिडीओमध्ये पकोडा बनवणारा त्याच्या हटके स्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र नेमका तो काय करतो आहे? हे पाहणं तितकच महत्वाचं आहे.

लुधियानामधील ब्रेड पकोडा विक्रेता अनोख्या पद्धतीने लोकप्रिय झाला आहे. ब्रेड पकोडे तळताना कढईमध्ये तेल ओतण्याची त्याची अनोखी स्टाईल आहे. कढईमध्ये पिशवी फाडून तेल ओतण्याऐवजी तो उकळत्या पाण्यात बंद तेलाच्या पिशव्या बुडवतो ज्यामुळे काही सेंकदातच तेलाच्या पाउचचे सील तुटते आणि तेल कढईमध्ये पसरते. मात्र ब्रेड विक्रेत्याची स्टाईल अनोखी असली तरी तितकीच गंभीर असल्याचं चित्र दिसत आहे.

 Viral Video
Dance Video Viral: तरूणाची गौतमी पाटीलला टक्कर; 'पाव्हणं इचार काय हाय तुमचा?' गाण्यावर केला भन्नाट डान्स, Video

व्हायरल व्हिडीओमध्ये लुनियानामधील एका ब्रेड पकोडा स्टॉलवर प्रचंड गर्दी दिसत आहे. फूड स्टॉलवरील हा विक्रेता खाद्यप्रेमीचे आकर्षण ठरत आहे ते म्हणजे त्याच्या कढईमध्ये तेल ओतण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला हा विक्रेता उकळत्या तेलामध्ये तेलाचे पाऊच बुडवताना दिसत आहे नंतर त्याच तेलात तो ब्रेड पकोडे तळून ग्राहकांना खायला देताना दिसतो आहे. विक्रेत्याच्या या तेल ओतण्याच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण होत आहे.

उकळत्या तेलामध्ये प्लास्टिक पिशवी बुडवल्याने तेलामध्ये मायक्रोप्लास्टिकचे तुकडे वितळू शकतात याच तेलामध्ये पकोडे तळल्यास ग्राहकांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे. अनेकांनी आरोग्य धोक्यात घालण्याबदद्ल प्रतिक्रिया दिल्या आहेत तर एका युजरने, पुढे म्हटले, "उकळत्या तेलात प्लास्टिकचे पाउच बुडवल्याने ते तुटतात आणि डायऑक्सिन्स, फॅथलेट्स, बीपीए आणि स्टायरीन सारखी विषारी रसायने बाहेर पडतात. हे तेलात मिसळतात, अन्नात मिसळतात आणि ते दूषित करतात. या विषारी पदार्थांमुळे कर्करोग, हार्मोनल असंतुलन, यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान, शुक्राणूंची संख्या कमी होणे, प्रजनन क्षमता आणि गर्भाच्या विकासाला हानी पोहोचणे आणि मुलांमध्ये मेंदूचे कार्य बिघडू शकते." प्रतिक्रिया दिली आहे.

 Viral Video
Landslide Viral Video: देव तारी कोण मारी! २ सेकंदामुळे वाचला जीव, धावत्या ट्रकसमोरच कोसळली दरड, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com