Landslide Viral Video: देव तारी कोण मारी! २ सेकंदामुळे वाचला जीव, धावत्या ट्रकसमोरच कोसळली दरड, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

उत्तराखंडमध्ये पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. ट्रक चालक थोडक्यात बचावला. व्हायरल व्हिडिओ पाहून खरा चमत्कार घडल्याचं जाणवतं. पावसाळ्यात प्रवास करताना काळजी घ्या.
Viral Video
Landslide Viral VideoSaam Tv
Published On

'देव तारी त्याला कोण मारी?' असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय एका ट्रक चालकाला आला आहे. त्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. उत्तराखंडमध्ये सध्या पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्याचं भूस्खलन झालं आहे यामुळे दरड कोसळ्याच्या घटना देखील घडत आहेत. अशातच सोशल मीडियावर देखील एका ट्रकचालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Viral Video
Sick Cow Video Viral: हीच खरी माणुसकी! आजारी गायीला पाठीवर घेत दवाखाना गाठला, Video व्हायरल

हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊसामुळे रस्त्याचे नुकसान झाले आहे. सध्या सोशल मीडियावर एका ट्रक चालकाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ट्रक चालकाचा १ सेकंदासाठी जीव वाचला आहे. हा व्हिडीओ पाहून खरचं ट्रक चालकासोबत चमत्कार घडल्याचं म्हणता येईल.

आजकाल कुठेही प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागते आहे. कधीही, कुठेही कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. निसर्गतील बदलामुळे पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. सध्या उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रस्ते बंद केले आहेत. रस्त्यांना तडा गेल्या आहेत. साचलेल्या पाण्यातून प्रवास करणं कठीण झालं आहे तर अनेक डोंगराळ भागात दरड कोसळणाच्या घटना देखील घडत आहेत.

Viral Video
Dance Viral Video: आजोबांचा सत्तरीतला जोश तरूणांना ही लाजवेल, धबधब्यासमोरच अहिराणी गाण्यावर डान्स Video

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रक जात असताना एक दगड पडत आहे. त्यामुळे ट्रक थांबला आहे मात्र थोड्याच वेळात ट्रकने रस्ता पार केल्यानंतर मोठमोठे दरड कोसळले. ट्रकने रस्ता पार केल्यानंतर काही सेकंदामध्ये दरड कोसळल्याने कोणतेही नुकसान व जिवितहानी झालेली नाही. काहीसा चमत्कारच घडला, असचं हा व्हिडीओ पाहून म्हणता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com