Sick Cow Video Viral: हीच खरी माणुसकी! आजारी गायीला पाठीवर घेत दवाखाना गाठला, Video व्हायरल

हिमाचल प्रदेशातील दोन गावकऱ्यांनी २०० किलो वजनाची आजारी गाय पाठीवर बांधून डोंगराळ रस्त्याने दवाखान्यात पोहोचवली. त्यांच्या माणुसकीच्या या कृतीने सोशल मीडियावर कौतुकाची लाट उसळली.
Viral Video
Sick Cow Video ViralSaam Tv
Published On

'मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे' अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून दिली जाते. हिंदू धर्मात गायीला मातेसमान मानले जाते. हवामान बदलामुळे मानवाप्रमाणे पशुप्राण्यांच्याही तब्येतीवर परिणाम होतो. त्यांच्या देखील आरोग्याची काळजी घेणे तितकच गरजेचे असते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आजारी गायीला पाठीवर बांधून दोघेजण प्रवास करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या या धाडसाचं कौतुक होत आहे.

Viral Video
Dance Viral Video: आजोबांचा सत्तरीतला जोश तरूणांना ही लाजवेल, धबधब्यासमोरच अहिराणी गाण्यावर डान्स Video

हिमाचल प्रदेशमधील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एका २०० किलो वजनाच्या आजारी गायीला पाठीवर बांधून घेऊन जाताना दिसत आहे. दयाराम आणि लाल सिंह असे असे दोघांचे नावे आहेत. गावातील नागरिक देखील त्यांच्या मदतीला दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.या दोघांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील सिरमौर या दुर्गम भागात ही घटना घडली आहे. डोंगराळ भागात या ठिकाणी रस्ते नाही आहेत. यामुळे वाहतुकीचे साधन उपलब्ध नाही. अशातच गाय आजारी असल्याने तिला चालता येत नव्हते. यामुळे गायीला पाठीवर बांधून दवाखान्यात नेण्यात आले आहे. गायीला उपचारासाठी नेणं अत्यंत आवश्यक असल्याने या दोघांनीही हे धाडस केले आहे. त्यामुळे त्यांच्या हिम्मतीचं विशेष कौतुक आहे.

या गावापासून १ तास अंतरावर प्राण्यांचा दवाखाना आहे. या दोघांनीही वजनदार गायीला घेऊन डोंगराळ भागातून चढ- उतार करून प्रवास केला आहे. गायीला या दोरीच्या सहाय्याने या दोघांच्या पाठीला बांधले आहेत. हे दोघेही वजनदार गायीला घेऊन हा प्रवास करताना दिसत आहेत. गायीला उपचार मिळावा यासाठी या दोघांनीही ही हिम्मत दाखवली आहे.

Viral Video
Barber Viral Video: सलूनवाल्याचं किळसवाणं कृत्य; कापलेले केस भाजीमध्ये टाकून खाल्ले, Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com