'ते म्हणजे दुतोंडी गांडूळ', शिंदेसेनेच्या खासदाराला संजय राऊतांनी डिवचलं

BJP Targets Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत बसल्याने वाद निर्माण. भाजपा आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली. संजय राऊतांचं खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
Published On
Summary
  • इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत बसल्याने वाद निर्माण

  • भाजपा आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली

  • संजय राऊतांनी स्पष्ट केलं - ठाकरेंनी स्वतः मागे बसण्याचा निर्णय घेतला

  • नरेश म्हस्केंना 'दुतोंडी गांडूळ' म्हणत संजय राऊतांचा जोरदार पलटवार

दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आणि आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. मात्र, बैठकीदरम्यान, ठाकरे पिता पुत्र आणि खासदार संजय राऊत यांना सहाव्या रांगेत बसवलं होतं. यावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्ष यावरून ठाकरेंना निशाण्यावर धरत आहे. या टीकांवर संजय राऊत यांनी खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना संजय राऊत म्हणाले. 'आम्ही मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. आमच्या समोर प्रेझेंटेशन सुरू होतं. उद्धव ठाकरे यांना पुढे बसवण्यात आलं होतं. पण त्यांचं म्हणणं होतं की, स्क्रीन समोरून पाहिल्यानंतर त्रास होतो. त्यामुळे आम्ही सर्वे जण मागे गेलो', असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
माधुरी कोल्हापूरात परतणार! अखेर वादावर पडदा, अंबानींनीच काढला तोडगा

'हे भाजपचे आयटी सेलवाले खरंच फालतू लोक आहेत. उद्धव ठाकरेंचे अजूनही काही फोटो आहेत. ते तुम्ही नीट पाहिले नाहीत का? उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचं संपूर्ण घर दाखवलं', असं राऊत म्हणाले.

'त्या दिवशी प्रेझेंटेशन सुरू होते. मी स्वत:ही तिथे हजर होतो. प्रमुख नेत्यांना पुढे बसवलं होतं. शरद पवार देखील आमच्यासोबत बसले होते. कमल हसन देखील होते. उद्धव ठाकरे म्हणाले होते, जवळून त्रास होईल, म्हणून आम्ही मागे बसलो', असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

Sanjay Raut
राज्यात पावसाचा लपंडाव! कुठे कोसळधार तर, कुठे उन्हाचे चटके; कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

नरेश म्हस्के दुतोंडी गांडूळ

या बैठकीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर खासदार नरेश म्हस्केंनी, 'ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली', अशी टीका केली होती. या टीकेला संजय राऊतांनी खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. 'म्हस्केंना सांगा, दुतोंडी गांडूळ, बाळासाहेबांची शिवसेना फोडताना तुम्हाला तेव्हा मान अपमान दिसला नाही का? दिल्लीत येऊन मोदी आणि शहा यांची चाटूगिरी करताय. तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का?', असा सवाल करत संजय राऊतांनी म्हस्केंना खरमरीत प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com