
महादेवी हत्तीणीसंदर्भातील वाद अखेर मिटला.
कोल्हापूरजवळ देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र उभारले जाणार.
राजू शेट्टींनी अनंत अंबानी आणि अंबानी कुटुंबाचे मानले आभार.
वनतारा संस्थेने आधुनिक आणि वैज्ञानिक तोडगा सुचवला.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधूरी हत्तीणीबाबत वाद अधिक चिघळला. मात्र, आता या वादावर पडदा पडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद आता संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी यावेळी अनंत अंबानी आणि अंबानी कुटुंबाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देत एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कोल्हापूरच्या जनतेचे महादेवी हत्तीणीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन वनतारा संस्थेनं एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. राज्यातील कोल्हापूरजवळील नांदणी परिसरात देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. महादेवीसारख्या हत्तींसाठी दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे.
यासंदर्भात राजू शेट्टी म्हणाले, 'लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण यांचा आदर करत वनताराने एक समन्वय साधणारा तोडगा काढला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो', असं म्हणत त्यांनी अंबानी कुटुंबाचे आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी यांनी स्पष्ट केले की, 'आम्ही जैन समाजाचे आहोत आणि ‘जिओ और जिने दो’ या तत्त्वावर जगतो. माधुरी हत्तीच्या छळाचा आरोप 'पेटा'ने आमच्यावर केला, जो आम्हाला सहन झाला नाही. जीव, जंतू आणि प्राण्यांविषयी आमचं प्रेम असल्याने हे आरोप वेदनादायक होते. त्यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता जो तोडगा निघाला आहे, तो स्वागतार्ह आहे आणि शेवट आनंददायक ठरतो आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.