Mahila Samriddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Mahila Samriddhi Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळणार ₹२५००; सरकारने केली मोठी घोषणा

Delhi Government Mahila Samriddhi Yojana: दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जाणार आहे.

Siddhi Hande

दिल्ली सरकारची नवी योजना

महिलांना दर महिन्याला मिळणार २५०० रुपये

अर्थसंकल्पात निधी मंजूर

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारनंतर राज्य सरकारनेही महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली होती. त्यानंतर दिल्ली सरकारनेही महिला समृद्धी योजनेची घोषणा केली. दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना सुरु केली आहे. दरम्यान, आता महिला समृद्धी योजनेसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी निधी मंजुर करण्यात आला आहे.

दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेत (Delhi Government Mahila Samriddhi Yojana) महिलांना आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील महिलांवर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जातात. या योजनेमुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने ५१०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

या महिलांना मिळणार लाभ

महिला समृद्धी योजनेत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष आहेत. या निकषांमध्ये बसत असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ ते ५९ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेची लाभार्थी महिला कमीत कमी ५ वर्ष दिल्लीची रहिवासी असावी. या योजनेच्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ ते ३ लाखांपर्यंत असावे. कुटुंबातील कोणीही टॅक्स भरत नसावे. महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नसावी. दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी.

योजना कधी सुरु होणार?

सरकारने योजनेची घोषणा केली आहे.या योजनेसाठी प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. यानंतर महिलांचे रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BH नंबर प्लेटचं जाळं वाढतंय; पण पुण्यात प्रतिसाद कसा आहे? आकडेवारीसह अहवाल समोर

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Crime News: बलात्कार केला, प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिर्ची टाकली; पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

SCROLL FOR NEXT