Government Scheme : महिलादिनी सरकारनं लाडक्या बहिणींना दिलं गिफ्ट; १ कोटी महिलांच्या बँक खात्यात पाठवले ५ हजार

Odisha Government Subhdra Scheme : महिला दिनानिमित्त ओडिशा सरकारने सुभद्रा योजनेअंतर्गत १ कोटी २ लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५,१०६.३३ कोटी रुपये जमा केले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
Government Scheme : महिलादिनी सरकारनं लाडक्या बहिणींना दिलं गिफ्ट; १ कोटी महिलांच्या बँक खात्यात पाठवले ५ हजार
Odisha Government Subhdra SchemeSaam Tv
Published On
Summary
  • महिला दिनानिमित्त ओडिशा सरकारकडून सुभद्रा योजनेचा चौथा हप्ता महिलांच्या खात्यात

  • १ कोटी २ लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५,१०६.३३ कोटी रुपये जमा

  • २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांच्या खात्यात दरवर्षी १०,००० रुपये दिले जातात

  • महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुभद्रा योजना महत्त्वाची

आज जगभरात ठिकठिकाणी जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. याचं दिनाचं औचित्य साधून ओडिशामध्ये मुख्यमंत्र्यांनी १ कोटी २ लाख महिला लाभार्थ्यांना ५,१०६.३३ कोटी रुपये वितरित करण्यात केले. सरकारच्या या निर्णयामुळे महिला दिनी स्त्रियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सुभद्रा योजना ही ओडिशा सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक मोठी कल्याणकारी योजना आहे. ज्याद्वारे २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरवर्षी १०,००० प्रमाणे ५ वर्षांत एकूण ५०,००० थेट बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना १७ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू करण्यात आली.

Government Scheme : महिलादिनी सरकारनं लाडक्या बहिणींना दिलं गिफ्ट; १ कोटी महिलांच्या बँक खात्यात पाठवले ५ हजार
Kokan M2M Ferries : कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या M2M फेरीला आणखी दोन ठिकाणी थांबा मिळणार; जाणून घ्या

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या कार्यक्रमात सांगितले की, महिला दिनाचं औचित्य साधून आज राज्यातील सगळ्या महिलांना सुभद्रा योजनेचा चौथा हप्ता देण्यात आला. १ कोटी २ लाख महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ५,१०६.३३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Government Scheme : महिलादिनी सरकारनं लाडक्या बहिणींना दिलं गिफ्ट; १ कोटी महिलांच्या बँक खात्यात पाठवले ५ हजार
Central Railway : मध्य रेल्वेच्या RPF आणि GPF पथकाची मोठी कारवाई! १२.८२ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त; असा सापडला आरोपी जाळ्यात

सुभद्रा योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सक्षम करण्यात त्यांचे सरकार यशस्वी झाले आहे. या योजनेच्या मार्फत अनेक महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन समाजात स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com