Kokan M2M Ferries : कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या M2M फेरीला आणखी दोन ठिकाणी थांबा मिळणार; जाणून घ्या
मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सेवेत जयगड आणि वेंगुर्ला थांबे जोडले जाणार
ही सेवा १ मार्चपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली
प्रवासाचा वेळ अवघा ६ ते ७ तासांवर येणार
कोकणवासीयांना रेल्वे गर्दी आणि खराब रस्त्यांपासून दिलासा
विनायक वंजारे, सिंधुदुर्ग
Mumbai To Vijaydurg M2M Ferry New Stop Announce कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी! बहुप्रतिक्षित मुंबई ते विजयदुर्ग ही रो-रो सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पर्यंत मर्यादित न राहता, आता जयगड आणि वेंगुर्ला येथे देखील थांबणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांना प्रवासादरम्यान आता रेल्वेच्या गर्दीपासून आणि रस्त्यांच्या खड्ड्यांपासून मुक्तता मिळणार आहे. अवघ्या ६ ते ७ तासांत आता कोकण वासीय आपल्या गावात पोहचणार आहेत.
होळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १ रोजी बहुप्रतीक्षित मुंबई ते सिंधुदुर्गातील विजयदुर्ग दरम्यान एम-टू-एम रो-पॅक्स फेरी सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली. मंत्री नितेश राणे यांनी या उद्घाटन करून या रो रो सेवेला हिरवा कंदील दाखवला.
ही सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी पहील्या टप्प्यात फेरी सुरू करण्यात आली आहे. आता या मार्गावरील इतर दोन थांब्यांसाठी सागरी महामंडळाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
त्यानुसार, रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथे या प्रवासी बोटीला थांबा देण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही जेट्टीचे काम येत्या महिनाभरात पूर्ण केले जाणार असून हे दोनही थांबे त्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
