Lek Ladki Yojana Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: राज्य सरकारची योजना! लेक १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १ लाख १ हजार रुपये

Maharashtra Government Lek Ladki Yojana: राज्य सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत १ लाख १ हजार रुपये दिले जातात.

Siddhi Hande

राज्य सरकारची लेक लाडकी योजना

मुलीच्या जन्मानंतर १८ वर्षांची होईपर्यंत मिळतात १ लाख १हजार रुपये

मुलींच्या शिक्षणासाठी केली जाते आर्थिक मदत

मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या राबवत असते. अनेकदा मुलींना काही कारणांमुळे मध्येच शिक्षण सोडावं लागतं. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.

२०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरु केली. या योजनेत सोलापूरातील १२हजार ४८३ मुलींना लाभ मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा झाले आहेत.

लेक लाडकी योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांना फायदा होतो. मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षांची होईपर्यंत १ लाख १ हजार रुपये दिले जातात. मुलींना सक्षम करण्यासाठी आणि स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. हे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातात. मुलगी मोठी होईपर्यंत ५ हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्रात जन्मलेली असावी. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी नसावे. या योजनेसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पात्र असायला हवे.

एका कुटुंबातील फक्त दोन मुलीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. फक्त दोन मुलींनाच पैसे मिळणार आहे. योजनेसाठी अर्ज करताना मुलगी, पालकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक देणे गरजेचे आहे. याचसोबत दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.याचे प्रमाणपत्र द्यायचे आहे.

पाच टप्प्यांमध्ये दिले जातात पैसे

मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६००० रुपये दिले जातात. सहावीत ७००० रुपये दिले जातात. अकरावीत ८००० रुपये तर मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपय दिले जातात. यासाठी मुलीचे शिक्षण सुरु असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT