AMRAVATI FARMERS LOAN WAIVER UPDATE: 30,555 FARMERS MAY MISS BENEFITS DUE TO PENDING E-KYC Saam Tv
बिझनेस

Farmer Loan Waiver : 'या' ३०,५५५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही; कारण आलं समोर

Maharashtra Farmer Loan Waiver Update News : अमरावती जिल्ह्यातील ३०,५५५ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

Alisha Khedekar

  • अमरावती जिल्ह्यातील ३०,५५५ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही

  • ७६,९७६ पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून ई-केवायसी अनिवार्य

  • ई-केवायसीसोबत ॲग्री स्टॅक नोंदणी पूर्ण करणेही आवश्यक

राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तब्बल ३०, ५५५ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याची शक्यता आहे. कारण अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीतातडीने पूर्ण करावे, अन्यथा कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहाल असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

अमरावती जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण १,२४,१४२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७६,९७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या खात्यात लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र या लाभासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने ई-केवायसी पूर्ण करणे आणि ॲग्री स्टॅक नोंदणी करणे अनिवार्य आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४६ हजार १४६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र ३० हजार ५५५ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप रखडलेली असून, त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

शेतकऱ्यांच्या नावात, कर्जाच्या रकमेत किंवा इतर तपशीलांमध्ये काही चूक असल्यास संबंधित बँक किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी बँकांमध्ये शेतकरी सहाय्यता कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : देवीच्या कृपेने पैसा वाढवण्याची मोठी संधी मिळेल, ६ राशींनी राहा सावध; वाचा रविवारचे राशीभविष्य

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT