भंडाऱ्यातील तुमसर शहरातील एका लॉजवर पोलिसांची धाड
वेश्याव्यसाय रॅकेटचा पर्दाफाश
महिला आरोपीसह एकूण सहा आरोपी ताब्यात
कारवाईदरम्यान देहव्यापाराच्या विळख्यात अडकलेल्या दोन महिलांची सुटका
भंडाऱ्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमसर शहरातील एका लॉजवर वेश्याव्यवसाय सुरु होता. या लॉजवर धाड टाकत पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफार्श केला आहे. या धाडीत एका महिला आरोपीसह पाच पुरुष आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, देहव्यापाराच्या विळख्यात अडकलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व सहा आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्त्रियांचा देहव्यापार, मानवी तस्करी तसेच अल्पवयीन मुला-मुलींच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि तुमसर पोलीस ठाण्याला गुप्त माहिती मिळाली होती.
या माहितीची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी संशयित लॉजवर नजर ठेवली. त्यानंतर प्लॅनिंग करून संयुक्त पथकाने अचानक धाड टाकत कारवाई केली. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एक महिला आणि पाच पुरुष आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
तसेच तेथे आढळून आलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित महिलांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.