December 2026 Rule Changes: Lpg, Credit Card, Nps And 6 Big Updates saam tv
बिझनेस

Rule Change: LPG ते Credit Card...; डिसेंबर महिन्यात देशभरात ६ मोठे बदल होणार, अनेकांचं बजेट कोलमडणार

December 2026 Rule Changes: डिसेंबरचा पहिला दिवस देशात अनेक मोठे आर्थिक बदल घेऊन येणार आहे. याचा परिणाम घरगुती स्वयंपाकघराच्या बजेटपासून ते कारप्रेमींच्या आवडीनिवडींपर्यंत दिसून येईल.

Bharat Jadhav

  • १ डिसेंबरपासून देशात सहा मोठे आर्थिक बदल होण्याची शक्यता

  • एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये बदल झाल्यास घरगुती बजेटवर परिणाम होणार

  • बँक ग्राहकांसाठीही काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.

नोव्हेंबर महिना संपत आला असून, सोमवार हा या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच देशात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या घरातील स्वयंपाकघरापासून ते तुम्ही क्रेडिट कार्ड वापरण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व गोष्टींवर होणार आहे. यासह महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कार खरेदीदारांना मोठा धक्का बसणार आहे. तसेच, डिसेंबर महिना बँक ग्राहक, पेन्शनधारक आणि करदात्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून, एनपीएस (NPS) नियमांमध्येही बदल होणार आहेत.

पहिला बदल: एलपीजी सिलिंडरपासून ते एटीएफ (ATF) किमतींपर्यंत

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करतात. १ डिसेंबर २०२६ रोजीही अशाच प्रकारे किमतींत सुधारणा केली जाणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतींत होणारा कोणताही बदल, घरगुती स्वयंपाकघरातील खर्चापासून ते रेस्टॉरंटमधील बिलांपर्यंत सर्व गोष्टींवर थेट परिणाम करू शकतो. गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल झाला आहे, तर १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. तसेच विमान इंधनाच्या (ATF) किमतीतही बदल होऊ शकतो.

दुसरा बदल: क्रेडिट कार्डद्वारे खर्च करणे महाग होणार

दुसरा बदल १ डिसेंबर २०२६ पासून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना लागू होईल. एसबीआय कार्ड (SBI Card) वापरकर्त्यांसाठी हा एक धक्का असू शकतो. या नवीन बदलांतर्गत, ३०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाहतूक-संबंधित व्यवहार आणि ५०,००० रुपयांपेक्षा जास्त इंधन खर्चावर १% शुल्क आकारले जाईल.

तसेच HDFC बँक 'बिझब्लॅक मेटल' (BizBlack Metal) क्रेडिट कार्डधारकांना आता 'ॲक्सिलरेटेड रिवॉर्ड्स' (accelerated rewards) मिळवण्यासाठी प्रत्येक स्टेटमेंट चक्रात किमान ५०,००० रुपयांचा पात्र किरकोळ खर्च (retail spend) करणे आवश्यक असेल. बँकेने व्हाउचरसाठी असलेली त्रैमासिक खर्च मर्यादाही ५ लाख रुपयांवरून कमी करून ४ लाख रुपये केलीय. हे बदल २१ डिसेंबर २०२६ पासून लागू होतील.

तिसरा बदल: आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे नियम बदलणार

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून, आयसीआयसीआय बँक एक असा बदल लागू करत आहे ज्याचा परिणाम सर्व ग्राहकांवर होईल. १ डिसेंबर २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन रचनेनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या बचत खातेधारकांना दरमहा तीन वेळा मोफत रोख रक्कम जमा करण्याची आणि तीन वेळा मोफत रोख रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे. परंतु जर ठेवी आणि पैसे काढण्याबाबतची दरमहा १ लाख रुपयांची मोफत मर्यादा ओलांडली गेली, तर लागू होणारे शुल्क प्रति १,००० रुपयांच्या व्यवहारामागे ३.५० रुपयांवरून वाढून ४ रुपये होईल, किंवा १५० रुपये किंवा यापेक्षा जास्त लागेल.

यासह ११ डिसेंबर २०२६ पासून, आयसीआयसीआय (ICICI) बँक आपल्या क्रेडिट कार्ड बदलण्याच्या शुल्कात वाढ करणार आहे; हे शुल्क आता ₹२०० अधिक वस्तू आणि सेवा कर (GST) वरून वाढवून ३०० रुपये इतके केले जाईल. दरम्यान १५ डिसेंबरपासून, आयसीआयसीआय बँक आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांशी संबंधित मिळणारे मोफत 'आयनॉक्स' (INOX) लाभही बंद करणार आहे.

चौथा बदल: टाटा कंपनीच्या गाड्या महागणार

कारप्रेमींसाठी एक मोठा धक्का ठरू शकतो. जर तुम्ही टाटा मोटर्सची कार किंवा एसयूव्ही (SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. १ डिसेंबरपासून टाटाची वाहने महाग होणार आहेत. किमतींमधील ही वाढ पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्व कारना लागू होईल. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सने २४ नोव्हेंबर रोजी किमती वाढवण्याची घोषणा केली. किमतींमधील बदल प्रत्येक प्रकारानुसार वेगवेगळे असतील.

पाचवा बदल: सेबीचे (SEBI) ट्रेडिंग नियम

१ डिसेंबर २०२६ पासून, सेबीचे मार्जिन नियम बदलले जातील. परिणामी, व्यापाऱ्यांना कमोडिटीच्या किमतींमधील अस्थिरतेच्या (volatility) आधारावर सुरुवातीचे मार्जिन (initial margin) राखणे अनिवार्य असणार आहे. यासाठी तीन श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. कमी अस्थिरता असलेल्या कमोडिटीसाठी ६टक्के मार्जिन, मध्यम अस्थिरता असलेल्या कमोडिटीसाठी ८ टक्के मार्जिन आणि उच्च अस्थिरता असलेल्या कमोडिटीसाठी १० टक्के मार्जिन ठेवण्यात येईल.

सहावा बदल: जीएसटी (GST) संबंधित बदल

सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स (CBIC) ने 'सेंट्रल जीएसटी (CGST) नियम, २०१७' मध्ये सुधारणा केलीय. २५ नोव्हेंबर रोजी या बदलांची अधिसूचना जारी करण्यात आलीय. ही सुधारणा जीएसटी नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज करण्याच्या सुधारित प्रक्रियेची अंमलबजावणी सुलभ करेल. पात्र अर्जांवर जीएसटी कॉमन पोर्टलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाईल, तर ज्या प्रकरणांमध्ये विवरणपत्रे (returns) प्रलंबित आहेत किंवा देय रक्कम थकीत आहे, ती प्रकरणे तपासणीसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! FDA मधील सहाय्यक आयुक्ताला केलं निलंबित; प्रशासनात खळबळ

Soaked Almonds Benefits: सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खाण्याची जादूच न्यारी! शरीराला मिळतील हे ७ फायदे

राहुल गांधी, खरगे अन् डीके शिवकुमारही मुंबईत; शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनेक दिग्गज मैदानात

Maharashtra News Live Update: डिलिमिटेशन बिल १०० टक्के पारित होईल- सुनिल तटकरे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक कारखान्यांकडून 2600 कोटींची काटामारी?

SCROLL FOR NEXT