Traffic Challan : वर्षभरात पाच चालान भरावे लागले तर ड्रायव्हिंग विसरा, परवाना होईल निलंबित, वाहतुकीचा नवा नियम जाणून घ्या

RTO rules for driving licence : वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आरटीओची नजर राहणार आहे थकीत ई-चलन असलेल्या वाहनांनाही याचा फटका बसणार आहे.
RTO rules for driving licence cancellation on traffic violations
RTO rules for driving licence cancellation on traffic violations SAAM TV
Published On: 

महाराष्ट्रात वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. यासोबतच अनेक दिवसांपासून ई-चलनाची रक्कम थकवणाऱ्या वाहनांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच आपल्या वाहनावरील प्रलंबित चलनांचा वेळेत भरणा करणे आवश्यक आहे.

पाच किंवा त्यापेक्षा अधिक उल्लंघनांवर कारवाई

महाराष्ट्रात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTO) परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RTO rules for driving licence cancellation on traffic violations
EPFO Rules 2026: निवृत्तीनंतर PF मधून दरमहा मिळणार 7 हजार रुपये? वाचा संपूर्ण गणित

केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ लागू झाल्यानंतर ही कारवाई केली जात आहे. या नियमांनुसार, वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांची यादी तयार करण्याची जबाबदारी आरटीओ कार्यालयांवर असेल. मोटार वाहन कायद्यातील कलम १९ अंतर्गत संबंधित चालकाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाऊ शकते. मात्र, पाच चलन झाले म्हणजे परवाना आपोआप निलंबित होईल, असे नाही. संबंधित चालकाची ओळख पटवून नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

दरवर्षी नव्याने तयार होणार उल्लंघनकर्त्यांची यादी

या कारवाईसाठी कॅलेंडर वर्षाचा आधार घेतला जाणार आहे. आरटीओ कार्यालये दरवर्षीच्या सुरुवातीला वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांची यादी अद्ययावत करतील. उदाहरणार्थ, २०२६ मध्ये झालेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांची मोजणी त्याच वर्षाच्या नोंदींनुसार केली जाईल. २०२६ मधील उल्लंघने २०२७ मधील उल्लंघनांमध्ये जोडली जाणार नाहीत.

RTO rules for driving licence cancellation on traffic violations
Post Office Top 5 Schemes: पोस्ट ऑफिसच्या 5 भन्नाट योजना! मिळवा 8.2% पर्यंत व्याज, गुंतवणुकीवर सुरक्षित परतावा

कारवाईसाठी प्रत्येक चलनाची नोंद चालकाच्या नावासह आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांकासह असणे आवश्यक आहे. केवळ वाहन क्रमांकाच्या आधारे तयार झालेल्या आणि चालकाची ओळख स्पष्ट नसलेल्या स्वयंचलित चलनांची मोजणी संबंधित व्यक्तीच्या उल्लंघनांमध्ये केली जाणार नाही.

थकीत ई-चलन असल्यास वाहन ब्लॅकलिस्ट होऊ शकते

परिवहन विभागाची कारवाई केवळ वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांपुरती मर्यादित राहणार नाही. दीर्घकाळ ई-चलनाची रक्कम न भरलेल्या वाहनांनाही ब्लॅकलिस्ट केले जाऊ शकते. अशा वाहनांच्या मालकांना वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे (आरसी) नूतनीकरण, पत्ता बदलणे, वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण आणि फिटनेस प्रमाणपत्र मिळवणे यांसारख्या सेवांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात. या सेवा मिळवण्यासाठी आधी सर्व प्रलंबित चलनांचा भरणा करावा लागू शकतो.

पीयूसी प्रमाणपत्र मिळवतानाही अडचण

थकीत ई-चलनांचा परिणाम वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रावरही होऊ शकतो. अशा वाहनांना नवीन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) देण्यासही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहनावरील ई-चलनांची स्थिती तपासून प्रलंबित रक्कम वेळेत भरावी. अन्यथा दंडासोबतच वाहनाशी संबंधित महत्त्वाच्या सरकारी सेवांवरही मर्यादा येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.