EPFO Rules 2026: निवृत्तीनंतर PF मधून दरमहा मिळणार 7 हजार रुपये? वाचा संपूर्ण गणित

Monthly PF Withdrawal : रिटायरमेंटनंतर पीएफमधून दर महिन्याला ७ हजार रुपये मिळू शकतात का? EPFO च्या नवीन SWP प्रस्तावात १० लाखांच्या पीएफचं गणित, व्याज आणि करासंबंधी माहिती वाचा.
EPFO New Rules
EPFO New RulesSaam Tv
Published On: 

नोकरी करताना प्रत्येक कर्मचाऱ्या पगारातून दर महिन्याला पीएफची रक्कम जमा केली जाते. हीच रक्कम रिटायरमेंटनंतर आर्थिक आधार ठरते. पण रिटायरमेंटनंतर संपूर्ण पीएफची रक्कम एकाच वेळी काढण्यापेक्षा आता दर महिन्याला ठराविक पैसे काढण्याची प्रोसेस सुरू करण्याचा EPFO चा प्रस्ताव आहे. त्यामुळे पीएफमधून हप्त्याचे काढलेल्या पैशांवर आयकर लागू न करण्याचीही योजना आहे. नेमकी ही सुविधा काय आहे आणि १० लाख रुपयांच्या पीएफवर दर महिन्याला ७ हजार रुपये कसे मिळू शकतात? जाणून घ्या.

निवृत्तीनंतर PF मधून दरमहा पैसे काढता येणार?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आणण्याचा प्रस्ताव तयार केलाय. हा प्रस्ताव लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर पीएफमधली संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याची गरज राहणार नाही.

त्याऐवजी कर्मचारी दरमहा, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा ठराविक रक्कम काढू शकतील. यामुळे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

EPFO New Rules
House Cleaning Tips : जुन्या मोज्यांना फेकून देऊ नका! फरशीवरील केस अन् धूळ साफ करण्याची भन्नाट ट्रिक

हप्त्याने पैसे काढल्यास आयकर लागणार नाही?

आता हप्ताने काढण्यात येणाऱ्या पीएफच्या रकमेवर आयकर लागू न करण्याचा विचार आहे. EPFO प्रमुख आणि केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली आहे. पण, ही सुविधा अद्याप लागू झालेली नाही. यासाठी EPF नियमांसोबतच आयकर कायद्यातही आवश्यक बदल करावे लागणार आहेत. EPFO ने हा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठवला आहे.

EPFO New Rules
Post Office Top 5 Schemes: पोस्ट ऑफिसच्या 5 भन्नाट योजना! मिळवा 8.2% पर्यंत व्याज, गुंतवणुकीवर सुरक्षित परतावा

१० लाखांच्या PF वर दरमहा ७ हजार रुपये कसे मिळणार?

EPFO प्रमुखांनी उदाहरण देऊन या योजनेचे गणित समजावले आहे.

पीएफ खात्यातील जमा रक्कम : १० लाख रुपये

उदाहरणासाठी वार्षिक व्याजदर : ८.२५ टक्के

एका वर्षाचे व्याज : ८२,५०० रुपये

दरमहा सरासरी व्याज : ६८७५ रुपये

म्हणजेच १० लाख रुपयांच्या पीएफवर ८.२५ टक्के व्याजदर गृहीत धरल्यावर दर महिन्याला दरमहा सरासरी ६८७५ रुपये म्हणजेच जवळपास ७ हजार रुपये मिळू शकतात.

शिल्लक रकमेवरही मिळत राहणार व्याज

तसेच या प्रस्तावाचा आणखी एक फायदा म्हणजे कर्मचारी हप्त्याने पैसे काढत असताना खात्यात उरलेल्या रकमेवरही इतर पीएफ सदस्यांप्रमाणे व्याज मिळत राहील. त्यामुळे रिटायरमेंटनंतर संपूर्ण बचत एकाच वेळी संपण्यापेक्षा गरजेनुसार पैसे वापरण्याचा पर्याय मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.