

घराची स्वच्छता करताना आपण दररोज झाडू आणि पोछा मारतो. फरशी स्वच्छ दिसावी यासाठी घरातले कोपरे साफ करतो. पण बऱ्याचदा झाडू-पोछा मारूनही फरशीवर केस, बारीक धूळ आणि कपड्यांचं लहान धागे तसेच राहतात. सोफा, बेड आणि कपाटाखाली साचलेली घाण साफ करताना मोठी कसरत करावी लागते. अशावेळी पुन्हा पुन्हा झाडू किंवा पोछा मारण्याची वेळ येते. पण आता या समस्येवर एक सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे. घरात पडून असलेल्या जुन्या मोज्यांचा वापर करून तुम्ही फरशीवरचे केस आणि धूळ सहज गोळा करू शकता.
घरात वापरत नसलेले जुने मोजे आपण फेकून देतो. पण, हेच मोजे घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही वापरू शकता. कॉटन किंवा कॉटन-ब्लेंड कापडाचे मोजे बारीक धूळ, केस आणि कपड्यांचे तंतू पकडायला मदत करतात. यासाठी तुम्हाला कोणतंही नवीन साहित्य खरेदी करण्याची गरज नाही. फक्त एक जुना स्वच्छ मोजा आणि फ्लॅट पोछा पुरेसा आहे.
१. जुना मोजा निवडा - सर्वप्रथम घरातला एक जुना, स्वच्छ आणि फारसा फाटलेला नसलेला मोजा घ्या. शक्यतो कॉटन किंवा कॉटन-ब्लेंड कापडाचा मोजा निवडा. त्यातून धागे किंवा तंतू निघत नसल्याची खात्री करा.
२. पोछ्यावर मोजा चढवा - आता हा मोजा फ्लॅट पोछ्याच्या खालच्या रुंद भागावर व्यवस्थित चढवा. पोछा वापरताना मोजा सतत निसटणार नाही, याची काळजी घ्या.
३. फरशीवर पोछा फिरवा - आता नेहमीप्रमाणे पोछा पुढे-मागे फिरवा. बेड, सोफा, कपाट आणि घराच्या कोपऱ्यांमध्ये ही पद्धत वापरा. मोज्याच्या कापडामुळे फरशीवरील केस, बारीक धूळ आणि कपड्यांचे तंतू एकत्र गोळा होण्यास मदत होते.
संपूर्ण घराची स्वच्छता झाल्यानंतर पोछ्यावरून मोजा काढा. मात्र, तो थेट फरशीवर झटकू नका. कचरापेटीच्या वर मोजा काढून त्यामध्ये अडकलेले केस आणि धूळ कचरापेटीत टाका. मोजा जास्त घाण झाला नसेल, तर तो स्वच्छ धुऊन वाळवून पुन्हा वापरता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.