राहुल गांधी, खरगे अन् डीके शिवकुमारही मुंबईत; शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनेक दिग्गज मैदानात

Rahul Gandhi meeting Sharad Pawar in Mumbai: डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्यासाठी राहुल गांधींची मोठी राजकीय खेळी. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि डीके शिवकुमार शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल.

कुठल्याही परिस्थितीत डिलिमीटेशन विधेयक हे मंजूर होऊ द्यायचे नाही यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जोरदार ताकद लावत आहेत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भेट निष्फळ ठरल्यानंतर राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री डि.के. शिवकुमार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक दिग्गज नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट असून इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ हे रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, त्यांनी पाठिंबा न द्यावा यासाठी राहुल गांधी मैदानात उतरले असून ते शरद पवार यांची मनधरणी करण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.