Soaked Almonds Benefits: सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खाण्याची जादूच न्यारी! शरीराला मिळतील हे ७ फायदे

Shruti Vilas Kadam

मेंदूसाठी फायदेशीर

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि चांगले फॅट्स असतात. हे घटक मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात बदाम खाणे फायदेशीर ठरू शकते.

Soaked Almonds | pinterest

हृदय निरोगी ठेवण्यास मदत

बदामामध्ये चांगले फॅट्स असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. योग्य आहारासोबत बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते.

Almond | yandex

पचनासाठी फायदेशीर

बदामामध्ये फायबर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास आणि पचन व्यवस्थित राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासही फायदा होऊ शकतो.

Soaking Almond | Canva

त्वचेसाठी चांगले

बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते. हे त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदामाचा समावेश करू शकता.

Benefits Of Almond

हाडे मजबूत ठेवण्यास मदत

बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. हे घटक हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात.

Soaking Almond | Yandex

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत

बदाम खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. मात्र, बदाम जास्त खाऊ नयेत, कारण त्यामध्ये कॅलरी जास्त असतात.

Almond Benefits

शरीराला एनर्जी मिळते

बदामामध्ये प्रोटीन, चांगले फॅट्स आणि मॅग्नेशियम असते. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात बदाम खाऊ शकता.

Soaked Almonds Benefits | Google

भिजवलेले बदाम कसे खावेत?

रात्री ५ ते ६ बदाम एका वाटीत पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यांची साल काढून खा. भिजवल्यामुळे बदाम मऊ होतात आणि खायला सोपे जातात. बदामाची अ‍ॅलर्जी असल्यास ते खाणे टाळा.

Almond Benefits

Sweater Cleaning Tips: स्वेटर आणि हुडी वर्षानुवर्षे नव्यासारखे राहतील; धुताना वापरा या ७ सोप्या ट्रिक्स

Sweater Cleaning Tips | Saam Tv
येथे क्लिक करा