Sweater Cleaning Tips: स्वेटर आणि हुडी वर्षानुवर्षे नव्यासारखे राहतील; धुताना वापरा या ७ सोप्या ट्रिक्स

Shruti Vilas Kadam

धुण्यापूर्वी लेबल तपासा

स्वेटर किंवा हुडी धुण्याआधी त्यावर दिलेल्या सूचना वाचा. काही कपडे हाताने धुवावे लागतात, तर काही वॉशिंग मशीनमध्ये धुता येतात. त्यामुळे कपड्याच्या लेबलनुसारच ते धुवा.

Hoodie, Jacket | yandex

थंड पाण्याचा वापर करा

स्वेटर आणि हुडी धुण्यासाठी थंड पाणी वापरा. गरम पाण्यामुळे काही कपडे आकसू शकतात. त्यामुळे कपड्यांचा आकार खराब होऊ नये म्हणून थंड पाण्यातच धुणे चांगले.

Winter Sweater | Yandex

सॉफ्ट डिटर्जंट वापरा

स्वेटर धुण्यासाठी जास्त स्ट्राँग डिटर्जंट वापरू नका. त्याऐवजी सॉफ्ट लिक्विड डिटर्जंट वापरा. यामुळे कपड्यांचा रंग आणि मऊपणा टिकून राहतो.

Winter Sweater | yandex

स्वेटर हलक्या हाताने धुवा

लोकरीचे स्वेटर शक्यतो हाताने धुवा. एका बादलीत थंड पाणी घेऊन त्यात थोडे लिक्विड डिटर्जंट टाका. स्वेटर काही वेळ पाण्यात ठेवा आणि नंतर हलक्या हाताने स्वच्छ करा. जोरात चोळू किंवा पिळू नका.

Winter Sweater | yandex

कपड्यांवरील डाग लगेच काढा

स्वेटर किंवा हुडीवर चहा, कॉफी किंवा खाण्याचे डाग पडल्यास ते लगेच स्वच्छ करा. डाग असलेल्या जागेवर थोडे लिक्विड लावून हलक्या हाताने पुसून घ्या. जोरात घासल्यास कपडा खराब होऊ शकतो.

Cropped jacket and sweater look | pinterest

स्वेटर सावलीत वाळवा

स्वेटर आणि हुडी वाळवताना कडक उन्हात ठेवू नका. लोकरीचे स्वेटर स्वच्छ टॉवेलवर पसरवून सावलीत वाळवा. यामुळे स्वेटरचा आकार आणि मऊपणा टिकून राहण्यास मदत होते.

wool sweater | saam tv

कपाटात व्यवस्थित ठेवा

स्वेटर आणि हुडी पूर्णपणे सुकल्यानंतरच कपाटात ठेवा. लोकरीचे स्वेटर हँगरला टांगण्याऐवजी घडी करून ठेवा. तसेच कपड्यांमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या.

Sweater

Nauvari Saree Draping: नऊवारी साडी नेसताना गोंधळ होतोय? या ७ सोप्या स्टेप्स फॉलो करुन नेसा परफेक्ट साडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nauvari Saree Draping | Saam Tv
येथे क्लिक करा