government rule on PNG and LPG connections India : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये ऊर्जा पुरवठा विस्कळीत झालाय. भारतामध्ये येणारी इंधनाची आयात थंबाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत देशावर इंधनाच्या तुटवड्याचे संकट कायम राहणार आहे. भारतामध्ये अनेक भागात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. जर आता तुमच्याकडे PNG आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असतील,तर सरकारचा हा नियम तुमच्यासाठीच असेल.
देशातील इंधनाच्या तुटवडा जाणवत आहेच. पण भविष्यातील संकट टाळण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. ज्या भागांत पाइपलाइनद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्या भागातील नागरिकांना आता पीएनजी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण जर ग्राहकांनी पीएनजी कनेक्शन उपलब्ध असूनही एलपीजी (LPG सिलिंडर) वापरणे सुरूच ठेवले, तर त्यांच्या घरातील कुकिंग गॅसचा पुरवठा कायमचा बंद केला जाईल.
फक्त एकाच प्रकारच्या इंधनावर (LPG) अवलंबून राहणं कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. देशातील गॅस पाइपलाइन नेटवर्कचा वेग वाढवला जाईल.सध्या व्यावसायिक (Commercial) गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे घरगुती गॅसचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. भारतामध्ये सध्या ३३.०५ कोटी एलपीजी ग्राहक आहेत. तर पीएनजी ग्राहकांची संख्या १.५७ कोटी इतकी आहे. उज्ज्वला १०.३५ कोटी लाभार्थी आहेत. यामध्ये अनेक घरात पीएनजी आणि एलपीजी असे दोन्ही कनेक्शन आहेत. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.
पीएनजी आणि एलपीजी, असे दोन्ही कनेक्शन असणारे देशात लाखो ग्राहक आहेत. वारंवार आवाहन करूनही अनेकजण एलपीजी सिलिंडर सरेंडर करत नाही. या ग्राहकांना आता सरकारकडून शेवटचा अलर्ट मेसेज पाठवला जात आहे. त्यामुळे जर वेळेत सिलिंडर सरेंडर जमा केला नाही, तर कनेक्शन कापले जाऊ शकते.
LPG रिफिल बुकिंग नियमांमध्ये बदल झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. सध्या नियम पूर्ववतच आहेत. शहरी भागात – २५ दिवसांचा किमान अंतर असावे. तर ग्रामीण भागात – ४५ दिवसांचा किमान अंतर असावेच लागेल. LPG चा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक पॅनिक बुकिंग टाळा, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.