पुण्यातील डेक्कन परिसरातील फ्लाईंग जिप्सी कॅफेमध्ये तुफान हाणामारी
जुन्या वादातून केला हल्ला
रिलस्टारसह ७ जणांना अटक
तरुणावर कोयत्याने केला हल्ला
पुण्यातील डेक्कन परिसरात स्वातंत्र्यदिनी भयंकर घडलं! फ्लाईंग जिप्सी कॅफेमध्ये १५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादातून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे सुमारे ३.४० वाजता घडलेल्या या प्रकारात अथर्व जगताप (वय १९) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला पुण्यातील एका रिलस्टारने केला असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी तपास सुरू केला असून रिलस्टारसह ७ जणांना अटक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व जगताप हा त्याच्या मित्रांसह फ्लाईंग जिप्सी कॅफेमध्ये बसला होता. त्यावेळी माधवी कुंभार आणि तिच्यासोबत काही जण कॅफेमध्ये आले. रील बनवणे, तसेच रिल्सवरील लाईक आणि कमेंट करण्याच्या कारणावरून यापूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी ते तिथे आले होते. त्यानंतर संशयितांनी कॅफेमध्ये घुसून अथर्ववर कोयत्याने हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत माधवी कुंभार, स्नेहल सोनके आणि शार्दूल ओव्हाळ या तिघांची नावे समोर आली आहेत. माधवी कुंभार हिचा पत्ता पोलिसांना मिळाला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. रीलस्टार माधवी कुंभारसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे.हल्ल्यात जखमी झालेल्या अथर्ववर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून कॅफेमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळावरून अधिक पुरावे मिळवण्यासाठी एफएसएलचे पथकही बोलावण्यात आले आहे. हल्ल्यासाठी वापरलेली रिक्षा आणि दुचाकीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पहाटेच्या वेळी कॅफेमध्ये घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.