Customers facing LPG delivery delays and overcharging can now file complaints through official channels. saam tv
बिझनेस

LPG डिलिव्हरीमध्ये उशीर होतोय, सिलिंडरसाठी एक्स्ट्रा पैसे मागितले? कुठे आणि कशी कराल तक्रार?

Gas Cylinder Issues: एलपीजी वितरणास विलंब होत आहे किंवा जास्त दर आकारले जात आहेत का? ऑनलाइन तक्रार कशी दाखल करावी, हेल्पलाइन क्रमांक आहे हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • LPG डिलिव्हरी उशीर आणि अतिरिक्त पैसे घेण्याच्या तक्रारी वाढल्या

  • ग्राहकांनी अधिकृत हेल्पलाइन आणि वेबसाइटवर तक्रार करावी

  • अतिरिक्त पैसे मागितल्यास त्वरित नकार देऊन नोंद घ्यावी

जगातील अनेक देशात युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय. युद्धाचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. तर काही ग्राहकांकडून डिलिव्हरीबॉय सिलिंडरसाठी त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे मागत आहेत.

तर काही ठिकाणी सिलिंडर वितरित न करता सिस्टीममध्ये तो वितरित झाल्याचे दाखवले जात आहे. याचा अर्थ असा की, एकीकडे एलपीजीचा तुटवडा असताना, दुसरीकडे काही ठिकाणी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुमच्याकडून म्हणा किंवा तुमच्या नातेवाईकांकडून असे पैसे जास्त घेत असतील तर याची तक्रार का. परंतु तक्रार कुठे करावी हे माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अतिरिक्त शुल्क किंवा डिलिव्हरीला झालेल्या विलंबाबद्दल तुम्ही कुठे तक्रार करू शकता.

सिलिंडरसाठी अतिरिक्त शुल्क आकारणं चुकीचे

गॅस सिलिंडरची किंमत सरकार आणि तेल कंपन्या ठरवतात. यामध्ये वितरण शुल्काचा समावेश असतो. जर वितरण करणारा व्यक्ती किंवा एजन्सी तुमच्याकडून ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे मागत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. ग्राहकांनी फक्त अधिकृत आणि निश्चित किंमत, दर दिले पाहिजे.

जर तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असेल किंवा वितरणास विलंब होत असेल, तर अशाप्रकारे तक्रार करू शकता. पहिली पद्धत म्हणजे थेट तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधणे. बऱ्याचदा तिथेच समस्येचे निराकरण होऊ शकते. जर तुम्हाला तिथूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर तुम्ही संबंधित गॅस कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता. यासह तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवरही तक्रार नोंदवू शकता. तेथे तुमच्या समस्येची नोंद केली जाते आणि पुढील कारवाई केली जाते. तुम्ही ऑनलाइन पोर्टलद्वारे देखील तक्रार दाखल करू शकता.

ऑनलाइन तक्रार कशी दाखल करावी

ऑनलाइन तक्रार दाखल करणे ही सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅसचे ग्राहक असेल तर तुम्ही त्या कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन ग्राहक सेवा विभागात तक्रार दाखल करू शकता. यासह तुम्ही उपभोक्ता हेल्पलाइनची वेबसाइट किंवा अॅपवर तुम्ही तुमच्या समस्या नोंदवू शकता.

टोल-फ्री नंबरवर तक्रार कशी दाखल करावी

जर ऑनलाइन तक्रार दाखल करणे शक्य नसेल, तर तुम्ही गॅस कंपन्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करूनही तुमची समस्या कळवू शकता.

Indane Gas हेल्पलाइन: 1800-233-3555,

Bharat Gas हेल्पलाइन: 1800-22-4344,

HP Gas हेल्पलाइन: 1800-233-3555

जेव्हा तुम्ही तक्रार दाखल करता, तेव्हा तुमचा ग्राहक आयडी, बुकिंग क्रमांक आणि समस्येचा संपूर्ण तपशील व्यवस्थित द्या. तसेच, तुमच्याकडे काही मेसेज, बिले किंवा स्क्रीनशॉट असल्यास ते सुरक्षित ठेवा. यामुळे तुमच्या तक्रारीचे निराकरण जलद आणि अचूकपणे होईल याची खात्री करण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT