कुठे पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग, कुठे सरकारी कार्यालये बंद! आखाती युद्धामुळे जगात लॉकडाऊनची स्थिती

Lockdown Situation in World: इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षातील तणाव वाढत असल्याने, जागतिक संकटाची भीती अधिक तीव्र झाली आहे. काही भागांमधील इंधनावरील निर्बंध आणि बंदमुळे जगभरात संभाव्य लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
Lockdown Situation in World:
Fuel shortages and rising global tensions trigger fears of a lockdown-like situation as Iran-US-Israel conflict escalates.saam tv
Published On

इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात शस्त्रसंधीबाबत लवकरच चांगली बातमी हाती येण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणला १५-कलमी शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशातील शांततेची चर्चा पाकिस्तानात होणार आहे. अमेरिकेपुढे इराणनेही आपल्या काही अट ठेवल्या आहेत. जर समजा दोन्ही देशातील वार्ता निष्फळ ठरली आणि युद्ध पुन्हा चिघळलं तर जगातील अनेक देशात लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Lockdown Situation in World:
Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच याबाबतचे संकेत दिलेत. आखाती युद्धामुळे कोरोनाकाळातील टंचाईसारखीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत दिला होता. आज दिल्लीत त्याबाबत सर्वपक्षीय बैठक होत आहे. त्या बैठकीनंतर देशपातळीवर अनेक उपाययोजना तसेच निर्बंध जाहीर होऊ शकतात. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडापासून आफ्रिका आणि युरोपमधील काही देशांमध्ये या युद्धामुळे काही निर्बंध आधीच जारी झाले आहेत.

Lockdown Situation in World:
होर्मुझची सामुद्रधुनी खुली,पण...; घोषणा करताना इराणनं ठेवली अट; भारताच्या जहाजांना परवानगी असणार? अनेक देशांचं टेन्शन वाढलं

लॉकडाऊनची चर्चा

मध्य पूर्व (पश्चिम-आशिया) मधील सततच्या तणावामुळे इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. ज्यामधून जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा जातो. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्या आहेत, तर अमेरिकेत पेट्रोलचा भाव प्रति गॅलन ५ डॉलर आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे खाद्यपदार्थांसह सर्व काही महाग होत आहे.

जगभरातील विमान कंपन्यांनी उड्डाणे कमी केली आहेत. एकट्या युनायटेड एअरलाइन्सनेच या आठवड्यात आपल्या ५ टक्के उड्डाणांमध्ये कपात केली आहे. तर इतर कंपन्याही तेच करण्याच्या मार्गावर आहेत. जपान आणि दक्षिण कोरियामध्ये इंधनाची रेशनिंग आधीच सुरू झाली आहे. तर बांगलादेश, फिलीपिन्स आणि श्रीलंकेमधील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. भारतासह ज्या देशांमध्ये ८० टक्के तेल याच सामुद्रधुनी मार्गाने येते, तिथे महागाईचा दबाव झपाट्याने वाढू लागला आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) 'तेलाच्या धक्क्यांपासून बचाव' नावाची १०-कलमी योजना प्रसिद्ध केली आहे. हे इंधन मागणी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते. यात वाहनांसाठी लायसन्स प्लेट-आधारित दिवस, महामार्गांवर वेगमर्यादा, हवाई प्रवासात कपात, घरून काम करणे आणि इलेक्ट्रिक स्टोव्हचा वापर यांसारख्या उपायांचा समावेश आहे.

एजन्सीचे म्हणणे आहे की, ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी या कोविडसारख्या रणनीती प्रभावी ठरतील. त्यांचा परिणाम लॉकडाउनसारखाच असेल. दरम्यान भारतातही इतर देशांप्रमाणे निर्बंध लागू होऊ शकतात. अतिरिक्त सरकारी सुट्ट्या, घरातून काम करण्याची सक्ती, इंधनाचा नियंत्रित पुरवठा म्हणजेच रेशनिंग आणि औद्योगिक क्षेत्राचे काम बंद ठेवण्यात येऊ शकतात. दरम्यान देशनिहाय लागू झालेल्या निर्बंधांबाबत माहिती घेऊ.

बांगला देश

शाळा,महाविद्याल, क्लासेस ऑनलाईन होणार आहेत.

विजेच्या पुरवठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी सर्व विद्यापीठे, परदेशी अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळा तसेच कोचिंग सेंटर्स बंद करून ऑनलाईन घेतले जाणार.

देशात नियंत्रित इंधन पुरवठा सुरू आहे.

वस्त्रोद्योगाला वीज पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, जेणेकरून निर्यातीवर परिणाम होणार नाही. यासाठी घरांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या वीजेवर कपात करण्यात येत आहे. देशात ५ तासांचा चक्रकार ब्लॅकआऊट असणार आहे.

तेलांच्या साठ्यावर संरक्षण उभारण्यात आले आहे, तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

भूतान

इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी थेट इंधनविक्रीवर बंदी आणण्यात आली आहे.

घरातून काम करण्यासाठी आराखडा लागू करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देत तेथे इंधन पुरवठा केला जात आहे.

पाकिस्तान

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा कामाचा आठवडा आणि ५० टक्के वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आले आहे.

शाळा आणि महाविद्यालये दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आले आहेत.

सरकारी विभागांना इंधनाचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

अत्यावश्य नसलेली सरकारी वाहनांना बाजुला सारण्यात आली आहेत.

फिलिपिन्स

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ४ दिवसांचा कामाचा आठवडा

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना घरून काम करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील अनावश्यक प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

व्हिएतनाम

व्यवसायांना घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येथील सार्वजनिक वाहतूक, सायकलिंग आणि कारपूलिंगला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

म्यानमार

नोंदणी क्रमांकावर अधारित, सम विषम दिवसाच्या तत्त्वार खासगी वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

इंधनाच्या तुटवड्यामुळे येथील पेट्रोल पंपांना कामकाज बंद करायला लावले आहे.

कंबोडिया

येथेही पेट्रोल पंप बंद पडले आहेत. देशातील ६३०० पेट्रोल पंपांपैकी सुमारे एक तृतीयांश पंप मार्च महिन्यात बंद करण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com