LPG Cylinder: सिलेंडरमध्ये 14 ऐवजी 8 किलोच गॅस? युद्धामुळे गॅसटंचाई, सरकारचे कंपन्यांना आदेश?

LPG Cylinder Weight Reduced from 14 Kg to 8 Kg Fact Check: गॅसच्या तुटवड्यामुळे एलपीजी सिलेंडरचे वजन 14 किलोवरून 8 किलो झाले आहे का? या व्हायरल दाव्यामागील तथ्य आणि सत्यता येथे जाणून घ्या.
LPG Cylinder Weight Reduced from 14 Kg to 8 Kg:
Viral claim about LPG cylinder weight reduction sparks confusion among consumers.saam tv
Published On

आता गॅस सिलेंडर 14 ऐवजी 8 किलोच मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय.पण, गॅस टंचाईमुळे हा निर्णय़ सरकारने घेतलाय का? हा निर्णय सरकारने घेतला असेल तर मग पैसे किती घेणार? असे सवाल उपस्थित होत असल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

LPG Cylinder Weight Reduced from 14 Kg to 8 Kg:
LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

देशात गॅसटंचाई निर्माण झाल्यामुळे आता सरकार नागरिकांना 14.2 किलोऐवजी 08 ते 10 किलोचा सिलेंडर उपलब्ध करून देणाराय. यासंदर्भात केंद्र सरकारनं तेल कंपन्यांना आदेश दिल्याचा दावा केला जातोय.पण, खरंच आता 8 ते 10 किलोचाच गॅस मिळणार आहे का? मग सिलेंडरची किंमत कमी करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेयत.

आधीच गॅस मिळत नसल्याने ग्राहक हैराण झालेयत. त्यात गॅस कमी देणार असल्याने चिंता वाढलीय. त्यामुळे खरंच आता सरकारनं कंपन्यांना आदेश दिलेत का. याची पडताळणी आम्ही सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

LPG Cylinder Weight Reduced from 14 Kg to 8 Kg:
LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

व्हायरल मेसेज

घरगुती गॅस 8 ते 10 किलोचाच नागरिकांना मिळणार

गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्याचे कंपन्यांना आदेश

जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार

मेसेज व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय.त्यामुळे आम्ही सत्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला.खरंच असा निर्णय सरकारने घेतलाय का? याची आम्ही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

घरगुती वापराचा सिलेंडर 8 किलोची मिळणार ही अफवा

सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही

गॅस ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल

सध्या गॅस मिळवण्यासाठी लोक रांगेत आहेत. त्याचाच फायदा घेऊन असे मेसेज व्हायरल केले जातायत.त्यामुळे तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत आता ग्राहकांना 8 ते 10 किलोचा सिलेंडर देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com