Banks will now verify criminal records along with CIBIL score before approving any loan. Saam Tv
बिझनेस

Bank Loan: कर्ज घ्यायचंय? तर कॅरेक्टर ठेवा चांगलं; सिबिलसह तपासलं जाणार तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड

Banks Check Criminal Records For Loan: बँका अर्जदाराच्या गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणार आहेत. जर कोणी कर्जासाठी अर्ज केला असेल तर बँका CIBIL स्कोअरसह अर्जदाराचा गुन्हेगारी रिकॉर्ड तपासणार आहे.

Bharat Jadhav

  • CIBIL स्कोअरसह अर्जदाराचे चारित्र्य त्याची पार्श्वभूमीही तपासली जाईल.

  • कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढणार

  • बँकांना फसवणूक आणि कर्ज न फेडणाऱ्यांपासून संरक्षण मिळेल.

सामान्य कर्जदारांसाठी आर्थिक सुरक्षा आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक महत्त्वाचे उपाय राबवले आहेत. गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जाच्या ईएमआय आणि सिबिल स्कोअरबद्दल असलेली चिंता मिटणार आहे. कारण आरबीआयनं नवीन मार्गदर्शक तत्त्वात बदल केलाय. याचबरोबर बँकांना कर्ज देतांना मोठा बदल केलाय. कर्ज हवं असेल तुम्हाला तुमचं काँरेक्टर चांगले ठेवावे लागेल. कारण बँका सिबिलसह तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणार आहे.

आतापर्यंत, बँका कर्ज देण्यासाठी प्रामुख्याने तुमचा सिबिल (क्रेडिट) स्कोअर, उत्पन्न आणि तारण काय ठेवणार हे विचारात घेत. आता बँका तुमची आर्थिक ताकद आणि सामाजिक स्थिती देखील तपासू शकते. यासह बँका लवकरच कर्ज मंजूरी प्रक्रियेत आणखी एक प्रमुख रिअल-टाइम फिल्टर जोडण्याचा विचार करत आहे. यात अर्जदाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाणार आहे.

तात्काळ कर्ज देण्यामुळे फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या वाढत आहे. यामुळे बँका सावध झाल्या असून त्यांनी काही नियम बनवले आहेत. जर कर्जदाराला अटक झाल्यास व्यवसाय ठप्प होऊन कर्जाची परतफेड थांबते. गहाण ठेवलेल्या वस्तूचा गैरवापर आणि चुकीचं सादरीकरणर रोखणं आवश्यक असणार आहे. ईडी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडील माहिती अनेकदा जुनी असते. फसवणुकीची वाढती प्रकरणे आणि तात्काळ कर्जातील धोका कमी करणं.

कर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास कर्जाची वसुली धोक्यात येते, त्यामुळे बँकांकडून नवीन नियम लागू केला जाऊ शकतो. गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणे कर्ज नाकारण्याचा एकमेव आधार असू नये. अनेकांवर किरकोळ खटले असतात, मात्र ते पैसे परत करत असतात. जर बँकांनी प्रत्येक पोलिस रेकॉर्डला रेड सिग्नल म्हणून पाहिले तर अनेक प्रामाणिक लोकांना कर्ज नाकारले जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटलंय.

बँकांना याची गरज का?

सध्या बँका कर्ज देण्यापूर्वी अर्जदारांची प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती, वसुली रेकॉर्डचे मूल्यांकन करतात. कधीकधी ते ईडी व आर्थिक गुन्हे शाखा सारख्या एजन्सींच्या तपास अहवालांवर अवलंबून असतात, परंतु ही माहिती अनेकदा जुनी असते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा एखाद्या प्रमुख व्यावसायिकाला किंवा प्रवर्तकाला गुन्ह्यासाठी तुरुंगात टाकले जाते.

तेव्हा त्यांचा व्यवसाय ठप्प होतो, ज्यामुळे कर्जाची परतफेड थांबते. गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा गैरवापर, गायब होणे किंवा फसवणूक करून चुकीचे सादरीकरण करणे या सामान्य तक्रारी आहेत. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे महत्त्वाचे झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro New Line: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला होणार सर्वाधिक फायदा?

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

Malaika Arora: मलायका अरोरा ज्याच्या प्रेमात पडली; तो हर्ष मेहता आहे कोण?

Accident: महामार्गावर अपघताचा थरार! भरधाव टेम्पो अन् कारची समोरासमोर धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेतली, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT