LIC Jeevan Tarun Policy Saam Tv
बिझनेस

LIC Jeevan Tarun Plan: दिवसाला फक्त ₹१५० गुंतवा अन् २६ लाख मिळवा; LIC जीवन तरुण पॉलिसी आहे तरी काय?

LIC Jeevan Tarun Plan Investment: एलआयसीने तरुणांसाठी खास जीवन तरुण पॉलिसी सुरु केली आहे. या पॉलिसीत मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.

Siddhi Hande

LIC जीवन तरुण पॉलिसी

दिवसाला १५० रुपये गुंतवा अन् २६ लाख मिळवा

मुलांच्या शिक्षणासाठी तयार केलीये खास योजना

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी दर महिन्याला पगारातून ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. आईवडील आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे बाजूला काढतात. दरम्यान, हे पैसे जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी एलआयसी जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमच्या मुलाच्या शिक्षणासठी तुम्ही लाखो रुपये मिळवू शकतात. एलआयसी जीवन तरुण पॉलिसी ही तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे. या योजनेत तुम्ही दर महिन्याला फक्त १० रुपये गुंतवून २६ लाख रुपये मिळवू शकतात.

काय आहे LIC जीवन तरुण पॉलिसी?

एलआयसी जीवन तरुण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) ही एक विमा पॉलिसी आहे. या योजनेत मुलांना शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. हा एक प्रिमियम इन्व्हेस्टमेंट प्लान आहे. यामध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळणार आहे. या योजनेत तुमचा मुलगा २५ वर्षांचा होईपर्यंत गुंतवणूक करायची असते.

१५० रुपयांची गुंतवणूक करा अन् २६ लाख मिळवा

एलआयसी जीवन तरुण पॉलिसीत तुम्हाला दररोज १५० रुपये भरायचे आहे. महिन्याला तुम्ही ४५०० रुपये भरणार आहात. वर्षाला ५४००० रुपये जमा करणार आहात. या योजनेत तुम्ही जर मुलगा १ वर्षांचा असताना गुंतवणूक सुरु केली तर मुलगा २५ वर्षांचा होईपर्यंत पैसे भरायचे आहेत. या पॉलिसीच्या शेवटी म्हणजेच तुमचा मुलगा २५ वर्षांचा झाल्यावर तुम्हाला २६ लाख रुपये मिळणार आहे. यामध्ये सम एश्योर्ड, अॅन्युअल बोनस आणि फायनल अॅडिशनल बोनसचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगा ९० दिवसांचा ते १२ वर्षांचा असावा. १२ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुले या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

पॉलिसीच्या मध्ये काढता येणार पैसे

या योजनेतून तुम्हाला मध्ये पैसे काढता येणार आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी २० ते २४ वयोगटात काही पैसे काढू शकतात. २५ व्या वर्षी तुम्हाला सर्व पैसे एकरकमी मिळणार आहेत. या योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT