KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी दिवाळीच्या दिवशी बोनसच्या मागणीसाठी केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त कामगारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त
Kalyan DombivliSaam Tv
Published On
Summary

केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचा दिवाळीच्या दिवशी बोनससाठी ठिय्या आंदोलन

श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून दोन महिन्यांपासून मागणी प्रलंबित

“कायम कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो, आम्हाला का नाही?” कामगारांचा सवाल.

प्रशासनाकडून निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार

संघर्ष गांगुर्डे, कल्याण-डोंबिवली प्रतिनिधी

दिवाळी सणाच्या दिवशीच बोनसच्या मागणीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी आज केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. दिवाळीचा आनंद साजरा करण्याऐवजी हातात फुलबाजे नव्हे तर मागण्यांचे फलक घेऊन हे कामगार प्रशासनाकडून न्याय मागत उभे राहिले.

गेल्या दोन महिन्यांपासून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या कंत्राटी कामगारांकडून बोनसची मागणी केली जात आहे. मात्र अनेक निवेदने दिल्यानंतरही अद्याप बोनसच्या रकमेबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी आज दिवाळीच्या दिवशीच आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त
Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

कामगारांचे म्हणणे आहे की, आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत असलो तरी आम्हीही महानगरपालिकेच्या कामकाजाचा अविभाज्य भाग आहोत. दिवाळीच्या आधी बोनस मिळावा ही आमची केवळ न्याय्य मागणी आहे. प्रत्येक वर्षी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो, मग आम्हाला का नाही?असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त
कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी केडीएमसी प्रशासनाला इशारा दिला की, जर तात्काळ बोनसचा निर्णय घेतला गेला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. दरम्यान आता हे आंदोलन कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com