उद्योगपती आणि राजकारण्यानंतर इन्कम टॅक्स विभागाने आपला मोर्चा पोलीस खात्याकडे वळवलाय... बुलढाणा जिल्हा पोलीस दलात इन्कम टॅक्सच्या नोटीशीमुळे खळबळ उडालीय.. एक दोन नव्हे तर तब्बल 1050 पोलिसांना इन्कम टॅक्सची नोटीस बजावण्यात आलीय.. आणि त्याला कारण ठरलंय आयकर रिटन्समध्ये बोगस कपात दाखवून कर चोरी केल्याचा संशय.... आता इन्कम टॅक्स विभागाने फक्त पोलीस अंमलदारांनाच नाही तर थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाही नोटीस बजावलीय... मात्र या नोटीशीत नेमकं काय म्हटलंय?
गेल्या 3-4 वर्षात CA च्या संगनमताने आयकर विवरण पत्रात बोगस कपातींचा उल्लेख
गृह कर्ज, विमा, म्युच्युअल फंड आणि पीपीएफ नसतानाही कपाती दाखवल्या
कलम 80 C आणि गृह कर्जावरील व्याज सवलतींचा समावेश आहे.. एवढंच नव्हे तर सर्व इन्कम टॅक्स रिटर्न्स एकाच सीएने भरल्याचं समोर आलंय.
आता बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 1050 पोलिसांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटीशीची पोलीस अधीक्षक निलेश तांबेंनी गंभीर दखल घेतलीय.. तर सर्व पोलीस अंमलदारांनी आपले इन्कम टॅक्स रिटर्न्स तपासून दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेत...तर या प्रकरणी साम टीव्हीने निलेश तांबेंशी संपर्क साधला असता अभ्यास करुन प्रतिक्रिया देणार असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे गेल्या वर्षीच्या रिटर्नमध्ये काही शिक्षकांनी खोट्या कारणांवरून टॅक्स परतावा मागितल्याचं उघड झालंय. त्यामुळे राज्यातल्या हजारो शिक्षकांनाही आयकर विभागाकडून समन्स आले आहेत.
मात्र आता इन्कम टॅक्सनं फक्त बुलढाणाच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचा-यांच्या उत्पनाची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याशिवाय करचुकवून शासनाची फसवणूक करणारे सरकारी बाबू वठणीवर येणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.