LIC Jeevan Anand Policy Google
बिझनेस

LIC Policy: रोज ४५ रुपये जमा करा अन् २५ लाख रुपये मिळवा; काय आहे LIC जीवन आनंद पॉलिसी? जाणून घ्या

LIC Jeevan Anand Policy: एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये नागरिकांना भरघोस व्याज मिळणार आहे. या पॉलिसीमध्ये दिवसाला फक्त ४५ रुपये जमा करायचे अन् मॅच्युरिटीनंतर तुम्हाला २५ लाख रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

भारतीय आयुर्विमा महामंडळ नेहमीच नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. या योजनांमध्ये नागरिकांना भरघोस परतावा मिळतो. अशीच एक योजना म्हणजे LIC जीवन आनंद पॉलिसी. जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्ही रोज ४५ रुपये भरुन २५ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेच लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वजण गुंतवणूक करु शकतात.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसी ही एक टर्म पॉलिसी आहे. ही पॉलिसी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही प्रिमियम भरु शकतात. या पॉलिसीमध्ये तुम्ही १ लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवू शकतात.

जर तुम्ही एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये रोज ४५ रुपये गुंतवले तर तुम्हाला २५ लाख मिळवू शकतात. रोज ४५ रुपये म्हणजे महिन्याला १३५८ रुपये जमा केले जातात.ही पॉलिसी १५ ते ३५ वर्षांपर्यंत उपलब्ध आहे. जर तुम्ही रोज ४५ रुपये भरले तर ३५ वर्षांनंतर तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील. रोज ४५ रुपये म्हणजेच तुम्ही वर्षाला या १६३०० रुपयांची गुंतवणूक करतात.

एलआयसीच्या या पॉलिसीत वार्षिक १६३०० रुपये गुंतवले म्हणजेच ३५ वर्षांसाठी तुम्ही ५,७०,००० रुपये होतील. या पॉलिसीचा मूळ विमा ५ लाख रुपये आहे. याच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ८.६० लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस मिळेल. ११.५० लाख रुपयांचा अंतिम बोनस दिला जाईल. या पॉलिसीमध्ये दोनदा बोनस दिला जातो. परंतु यासाठी तुमची पॉलिसी १५ वर्षांची असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT