पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांनाच अर्थसंकल्पाची प्रतिक्षा लागली होती. अखेरी ही प्रतिक्षा संपली आज म्हणजेच २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता या अर्थसंकल्पाला सुरुवात होईल. यामध्ये सर्वसामान्यांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2024) देशातील मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांसाठीही घोषणा होऊ शकतात. तसेच इंधन दरवाढीबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेता पेट्रोलियम पदार्थांना (Petrol-Diesel Price) जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भातही विचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीच्या उपकरणांवर आकरण्यात येणाऱ्या जीएसटीत देखील कपात केली जाऊ शकते. तसेच ३ कोटी लोकांना हक्काचे घर मिळू शकते.
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकते. ज्यामुळे इंधनाच्या दरात मोठी कपात होईल.
रेल्वे तिकीटात ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा सूट मिळू शकते. पूर्वी ही सूट दिली जायची, पण नंतर ती बंद करण्यात आली.
अर्थसंकल्पामध्ये देशातील रेल्वेच्या विभागासाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण या शेतीविषयी असलेल्या उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा करू शकतात.
सध्या पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ६००० रुपये जमा होतात. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
देशातील ३ कोटी लोकांचं लवकरच घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अर्थसंकल्पात पीएम आवाज योजनेसाठी मोठी घोषणा होऊ शकते.
अर्थसंकल्पामध्ये रोजगार वाढवण्यासंदर्भात भर देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.