Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam Tv

Petrol Diesel Rate Today: अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील इंधनाचा आजचा भाव काय? जाणून घ्या...

Petrol Diesel Rate 23rd July 2024: आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Published on

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काय घोषणा होणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे अशी आहे.

पेट्रोल डिझेलवर सध्या वॅट दर लावला जात आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. या अर्थसंकल्पात इंधनावर जीएसटी कर लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया देशातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Petrol Diesel Rate
Royal Enfield: रुबाब वाढणार! Royal Enfield देणार 32 kmpl चं मायलेज, गजब मायलेजसह असेल शानदार स्पीड; जाणून कधी येणार बाईक

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.कोलकत्यात पेट्रोल १०४.९५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९१.७६ रुपयांवर विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४४ रुपये आहे.

Petrol Diesel Rate
Maruti च्या या SUV वर मिळत आहे 3.30 लाखांची सुट, ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव काय?

पुण्यात पेट्रोल १०३.९७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.३० रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.६९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.२० रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.६४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.१२ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.३६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.८७ रुपये आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०१ रुपये आहे.

Petrol Diesel Rate
Budget 2024 Expectations: शेतकऱ्यांना ६००० वरून ८००० रुपये मिळतील का? अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठ्या घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com