Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश; नेमकं काय आहे प्रकरण?

Sambhaji Raje on Vishalgad Fort : माजी खासदार संभाजी राजे छत्रपती उद्या विशाळगडवरील अतिक्रमण काढण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 14 जुलै रोजी बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam Digital
Published On

किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारल्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती उद्या विशाळगडवरील अतिक्रमण काढण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 14 जुलै रोजी सकाळी 6 ते 29 जुलै रोजी रात्री 24 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी जारी केले आहेत.

संभाजी राजे छत्रपती यांनी चलो विशाळगडचा नारा दिला आहे. तर पुण्यातून धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवभक्त विशाळगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. हातोडा, कुदळ, फावड्याचं पूजन करून शिवभक्त पुण्यातून विशाळगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या सकाळी राज्यभरातील हजारो शिवभक्त विशाळगडावर पोहोचणार असल्यांची माहिती आहे.

विशाळगडावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झालं आहे, ते मुक्त करण्याची अनेक शिवभक्तांची मागणी आहे. सरकारने देखील अतिक्रमण केलं आहे. उद्या शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगावर जाणार आहे. सरकारने विशाळगावर हेरिंग का लावली नाही अटॉर्नी जनरल झोपले होते का? असा संतप्त सवाल संभाजी राजेंनी केला आहे.

Kolhapur News
PM Narendra Modi Speech : मुंबईनजीक ७६००० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी, १0 लाख रोजगार निर्मिती होणार!: PM नरेंद्र मोदी

सरकार ने गेल्या दीड वर्षात कारवाई का केली नाही चलो विशाळगड म्हणालो आणि हे जागे झाले ?. महायुतीशी सलगी वाढवणारे आमदार अतिक्रमणाला सपोर्ट करतात. विशाळगावर ते राजकारण करत आहेत. आमदार विनय कोरे यांचं नाव त्यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण काढलं, मला त्यांच्या वर विश्वास आहे. पण ते विशाळगडावर का बोलत नाहीत? दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. गृहमंत्री बोलत नाहीत, त्यांनी यावर बोललं पाहिजे, असं आवाहन संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेत केलं.

Kolhapur News
PM Modi Mumbai Visit: महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार! PM नरेंद्र मोदीचं मुंबईबाबतही मोठं विधान, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com