Nashik News : पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत; खत विक्री थांबली

Nashik News : नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र काही पेरण्या खोळंबल्या आहेत. जुननंतर पावसाने ओढ दिली ती जुलै महिना अर्धा संपला तरी आजतागायत कायम आहे
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : एकीकडे राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीच्ये प्रचंड नुकसान होत आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या नांदगाव, मनमाडसह ग्रामीण भागात पावसाने ओढ दिलेली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर शेतकऱ्यांसह खते विक्रेते देखील अडचणीत सापडले आहे. 

Nashik News
Manvat Bajar Samiti : गतवर्षीच्या तुलनेत सव्वा लाख क्विंटलची आवक वाढली; मानवत बाजार समितीकडून ५ लाख क्विंटल कापूस खरेदी

नाशिक (Nashik) जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र काही पेरण्या खोळंबल्या आहेत. जुननंतर पावसाने ओढ दिली ती जुलै महिना अर्धा संपला तरी आजतागायत कायम आहे. दरम्यान राज्यातील सांगली, नागपूर, चंद्रपूर, मुंबई, पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. पाऊस सुरूच असल्याने शेतात मशागत देखील करता येत नाही. तर नाशिक जिल्ह्यात अजूनही पाहिजे तसा पाऊस (Rain) झाला नसल्याने खरिपाच्या पिकांना खतेही देता येत नसल्याने त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) चिंतेत सापडला आहे. 

Nashik News
Shahada News : शहादा शहरात बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक; रात्रीच्या घटनेने प्रवाशी भयभीत

खतांची विक्रीच होईना 

हवामान खात्याने सुरवातीला यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. या अंदाजानुसार खत विक्रेत्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात खते भरून ठेवली आहेत. मात्र पाऊस नसल्याने पिकांना खत देता येणे शक्य नाही. यामुळे शेतकरी खते खरेदी करत नाही. यामुळे खते विक्रेते देखील आता अडचणीत सापडले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com