LIC Scheme google
बिझनेस

LIC Scheme: महिलांसाठी LICची जबरदस्त योजना! दहावी पास असणाऱ्यांना महिन्याला मिळणार ₹७०००, लाभ कसा घेता येईल?

LIC Bima Sakhi Scheme: महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. पुढील योजनेत दहावी पास महिलांसाठी जबरदस्त योजना आहे. त्यात तुम्हाला दरमहा ७००० रुपये दिले जातात.

Saam Tv

देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी LIC मध्ये कोणत्याही वर्गातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्हाला भविष्यासाठी पैसे गुंतवता येतात. लहान मुलांपासून ते वृद्धांसाठी विविध योजना आहेत. मात्र LIC ने खास महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी खास योजना सुरु केली आहे. त्यामध्ये महिलांना कमीत कमी ७००० रुपये दर महिना कमवता येतील.

LIC मध्ये अनेकवर्षांपासून नागरिक विश्वाने गुंतवणूक करत आहेत. तर महिलांना दर महिन्याला ७००० रुपये कमवायचे असतील तर एलआयसी विमा सखी योजनेत (LIC Bima Sakhi) सहभागी व्हा. आत्तापर्यंत अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

तुम्हाला या विमा सखी योजना ग्रामीण महिलांना विमा बनवण्याची आणि गावात विम्याची जागरुकता निर्माण करण्याची संधी यामध्ये मिळते. यामध्ये सहभाग घेण्यासाठी महिलांचे वय १८ ते ७० वयाच्या आत असावे. तसेच दहावी पास महिलांनाच यामध्ये सहभाग घेता येतो.

तुम्हाला या योजनेत (LIC Vima Sakhi Yojana For Women)पॉलिसी इतर महिलांना विकायची असते. ती विकल्यानंतर त्याचे कमिशन तुम्हाला मिळते. तर सहभागी महिलांना पहिल्या तीन वर्षात एक ठरलेला पगार दिला जातो.

महिलांना यामध्ये पॉलिसी विकल्यावर पुढील तीन वर्षांसाठी पगार दिला जातो. पहिल्या वर्षात महिलांना ७००० रुपये देतात. दुसऱ्या वर्षात महिलांना ६००० तर तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जातात. ज्या महिला त्यांचे टार्गेट पूर्ण करतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट पूर्ण करतात. त्याचं कमिशन दिलं जातं. ३ वर्ष पूर्ण झाल्यावर त्या महिला LIC एजन्ट म्हणून महिला काम करू शकतात. याची एकच अट आहे की, तुम्ही एका वर्षात सुरु केलेल्या ६५ टक्के पॉलिसी सुरू असल्या पाहिजेत. याची महिलांना ट्रेनिंग दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT