Ladki Bahin Yojana: मार्च-एप्रिलचा लाडकीचा हप्ता का थांबवला? आता कोणाला मिळणार १५०० रुपयांचा लाभ? वाचा...

Women Government Scheme : लाडकी बहीण योजनेचा मार्च- एप्रिलचा हप्ता अद्याप काही महिलांना पाठवण्यात आला नाही. पुढील माहितीत आपण याची संपूर्ण कारणे जाणून घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanagoogle
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती

मार्च- एप्रिलचा हप्ता काही महिलांना आलेला नाही

ई-केवायसी आणि आधार-बँक लिंक असणे आवश्यक आहे

राज्यातल्या अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. मात्र मे महिना संपत आला तरी खात्यावर पैसे आलेले नाहीत. आता महिलांच्या मनात असा प्रश्न निर्माण झालाय की, कोणत्या बहिणींना या योजनेचा हप्ता मिळणार? बऱ्याच महिला याची तपासणी करण्यासाठी सरकारी कार्यालयात, केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत.

लाडक्या बहिणींच्या मनातील प्रश्न

महिलांना आर्थिकदृष्ठ्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली. ज्यामध्ये महिलांना दरमहा १५०० रुपयांचा हप्ता मिळत होता. हा हप्ता हा थेट महिलांच्या खात्यावर येत होता. मात्र काही महिलांना मार्च- एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. आता प्रश्न हा आहे की, लाडकीचे पैसे का थांबवण्यात आले? कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाहीत? पुढील माहितीत आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

Ladki Bahin Yojana
UPI Users Alert: ...तर तुमचं UPI पेमेंट तात्काळ ब्लॉक होणार, बँकांनं घेतला मोठा निर्णय

मार्च- एप्रिलपासून हप्ता बंद

लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना खूप फायदेशीर ठरत होता. मुलांच्या औषधपाण्यासाठी, घर खर्चासाठी तर काहींना बचतीसाठी हे पैसे उपयोगी पडत होते. ही रक्कम जरी कमी असली तर त्याचा योग्य वापर केला जात होता. महिला दर महिन्याच्या हप्ताची वाट पाहायच्या. पण काही महिल्यांच्या खात्यावर मार्च- एप्रिलचा हप्ता आलाच नाही.

नेमकं कारण काय?

महिलांच्या खात्यावर पैसे न येण्याचं कारण म्हणजे काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. सरकारकडे अशा तक्रारी गेल्या की, काही गरजू महिलांना याचा लाभ घेता येत नव्हता. तसेच काही अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे सरकारने ईकेवायसी करण्याचा निर्णय घेतला. तसेच बॅंक लिंकींग, इतर कागदपत्रांची पडताळणी केली.

Ladki Bahin Yojana
LPG Price Today: १४ आणि १९ किलो सिलेंडरची किंमत वाढली का? वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

कोणत्या लाडकीचा हप्ता केला बंद?

सरकारने पडताळणी केल्यानंतर, ज्या महिलांचे आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक नव्हतं आणि ज्यांनी ईकेवायसी प्रोसेस पूर्ण केली नव्हती त्यांचा हप्ता थांबवला. सरकारचे म्हणणे आहे की, ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. इतर अपात्र महिलांचे हप्ते थेट बंद करण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com