Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० बंद का झाले? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Eligibility : महाराष्ट्रातल्या लाडक्या बहीणींसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. अपात्र महिलांना किंवा ई- केवायसी न केलेल्या महिलांना पुढील हप्ता येणार नाही.
Ladki Bahin Yojana Eligibility
Ladki Bahin Yojana Eligibility google
Published On
Summary

लाडक्या बहिणींंसाठी महत्वाची माहिती

मे महिन्याचा हप्ता अपात्र महिलांना येणार नाही

ई केवायसी मुदतही संपली आहे

योजनेस पात्र महिलांना कोण आहेत?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चेत आहे. योजनेतील पात्र महिलांना यामध्ये दरमहा १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. याने महिलांना आर्थिकदृष्ठा सक्षम होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातील काही महिलांचा लाभ आता थांबवण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजना ही विशेष म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मदत म्हणून सुरु करण्यात आली. याची सुरुवात ही २८ जून २०२४ पासून करण्यात आली. तेव्हापासून या योजनेचा लाभ महिला घेत आहेत. मात्र याचा वापर अनेक अपात्र महिलांनीही घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पात्र महिलांना याचा लाभ घेता आला नाही. त्यासाठी विशेष ई-केवायसी प्रोसेस करणं अनिवार्य केलं. त्यातून पात्र महिलांची निवड करण्यात आली.

Ladki Bahin Yojana Eligibility
Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

पात्र लाडक्या बहिणी कोण?

लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी पात्र महिला या महाराष्ट्रातील निवासी असणं अनिवार्य आहे. राज्यातल्या विवाहीत, विधवा, घटस्फोट घेतलेल्या महिल्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. एका कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिलेला लाभ घेता येतो. तर यासाठी महिलांचे २१ वर्षे पूर्ण झालेले असावे. तसेच ६५ वर्षांच्या आतील महिला या योजनेसाठी पात्र असतात. महत्वाचं म्हणजे लाभार्थी महिलांकडे स्वत: चं आधार लिंक असलेलं बॅंकेचं खातं असणं आवश्यक आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र असतात.

मार्च-एप्रिल महिन्यात ई-केवायसी केल्यानंतर १ कोटी ८९ लाख बहिणी या पात्र ठरल्या आहेत. तर ५४ लाख महिला लाभार्थी ठरल्या आहेत. या योजनेसाठी e-kyc प्रोसेसची अंतिम मुदत ही ३० एप्रिलपर्यंत देण्यात आली होती. त्यामुळे ज्या महिलांनी त्यांची माहिती दुरुस्त केली आहे. त्यांनाच मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला मिळेल. याबाबतची अधिक माहिती तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर मिळवू शकता.

Ladki Bahin Yojana Eligibility
FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशाची पहिली यादी कधी जाहीर होणार? तारीख आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com