

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली. ही प्रोसेस ऑनलाइन पद्धतीने झाली आणि त्याला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत जवळपास १२ लाथ ४९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. तर पहिल्या फेरीची निवड यादी ही शुक्रवारी जाहीर होणार असं जाहीर केलं आहे.
यंदा राज्यातल्या ९,५११ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख ५९ हजार ५३ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवल्या. त्यातल्या १७. ४२ लाख जागा कॅप (CAP) अंतर्गत उपलब्ध असतील. तसेच काही जागा इन- हाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापनाकडे राखीव असतील. आत्तापर्यंत वेगवेगळ्या कोट्यातून ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला आहे.
अकरावी प्रवेशाच्या नोंदणीच्या बाबतीत मुंबई विभाग हा अव्वल ठरला. मुंबईतल्या २ लाख ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अर्ज भरले आहेत. तसेच पुणे विभागातून २ लाख ७ हजार ७९४, नाशिकमधून १ लाख २७ हजार ६८१ आणि छत्रपती संभाजीनगर विभागात १ लाख १७ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा अर्ज भरला आहे.
त्यामुळे फेरीचला कट-ऑफ किती लागणार? याची उत्सुकता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. निवड यादीत नाव असेल तर विद्यार्थ्यांना संबंधिक कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येईल. त्यामुळे २९ ऑगस्टच्या निवड यादीकडे राज्यभरातल्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.