LIC Jeevan Tarun Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! या योजनेत मॅच्युरिटीवर मिळतात ५.८४ लाख रुपये; वाचा कॅल्क्युलेशन

LIC Amrit Bal Policy: एलआयसीची अमृत बाल पॉलिसी मुलांच्या भविष्यासाठी उत्तम आहे. या योजनेत तुम्हाला इन्श्युरन्ससोबत चांगला परतावादेखील मिळतो. या योजनेत किती रक्कम गुंतवायची याबाबत माहिती जाणून घ्या.

Siddhi Hande

LIC अमृत बाल पॉलिसी

इन्श्युरन्ससोबत मिळणार जबरदस्त परतावा

मुलांच्या भविष्यासाठी उत्तम योजना

प्रत्येकजण आपल्या पगारातील काही ठरावीक रक्कमेची बचत करतात. ही बचत केलेली रक्कम तुम्ही विविध योजनेत गुंतवणूक करु शकतात. तुम्ही एलआयसीच्या अमृत बाल पॉलिसीत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला इन्श्युरन्स मिळतो. याचसोबत गुंतवणूकीवर चांगलापरतावादेखील मिळतो.

नॉन लिंक्ड इन्श्युरन्स पॉलिसी

एलआयसीने लहान मुलांसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्ही चांगली रक्कम मिळवू शकतात. याचसोबत या योजनेच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. ही योजना नॉन लिंक्ड लाइफ इन्श्युरन्स आहे. यामध्ये मुलांचे भविष्य सुरक्षित होते.

एलआयसी अमृत बाल पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी मुलाचे कमीत कमी वय ३० दिवस असायला हवे. जास्तीत जास्त १३ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. ही पॉलिसी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने खरेदी करु शकतात. या योजनेत तुम्हाला २,००,००० रुपये गुंतवायचे आहे. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी तुम्ही कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त २५ वर्षांचा कालावधी निवडू शकतात.

या योजनेत तुम्ही प्रिमियम दर महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला किंवा वार्षिक आधारावर देऊ शकतात. या योजनेत सिंगल प्रिमियम आणि लिमिटेड प्रिमियम असे दोन ऑप्शन मिळतात.

या योजनेत जर तुम्ही २,००,००० नुसार कॅल्क्युलेशन केले तर ७ वर्षांचा प्रिमियम निवडल्यावर वर्षाला तुम्हाला ३०,७७५ रुपये भरावे लागणार आहे. दर महिन्याला ७,९०३ रुपये भरावे लागणार आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक २.१५ लाख होणार आहे. यावर तुम्हाला गॅरंटीड ३.८४ लाख रुपये मिळणार आहे. २५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर मिळणारा फंड ५.८४ लाख रुपये असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

PF चे पैसे ATM मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार EPFO 3.0? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT