Lek Ladki Yojana Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: तुमची मुलगी लखपती होणार! १८ वर्षांची होईपर्यंत राज्य सरकार देतंय १ लाख रुपये; 'लेक लाडकी' योजना आहे तरी काय?

Lek Ladki Yojana For Girls: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेत मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला १ लाख १ हजार रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने आतापर्यंत मुलींसाठी, महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्रासोबत अनेक राज्य सरकारनेदेखील मुलींसाठी काही खास योजना राबवल्या आहेत.महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. या योजनेत मुलींना १,०१,००० रुपये दिले जातात.

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात.या योजनेत तुमची लेक १८ वर्षांची होईपर्यंत पैसे दिले जातात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. (Lek Ladki Scheme For Girls)

लेक लाडकी योजना नक्की आहे तरी काय? (Lek Ladki Yojana)

महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना हे पैसे दिले जातात. या योजनेत मुलगी जन्माला आल्यावर ५००० रुपये दिले जातात. जेव्हा तुमची मुलगी पहिलीत जाईल, तेव्हा तिला ६००० रुपये दिले जातात. यानंतर मुलगी जेव्हा सहावीत जाईल तेव्हा ६००० रुपये दिले जातील.

यानंतर मुलीचे दहावीचे शिक्षण झाल्यावर अकरावीत प्रवेश घेईल तेव्हा ८००० रुपये दिले जातील. यानंतर मुलगी जेव्हा १८ वर्षांची होईल. तेव्हा मुलींना ७५००० रुपये दिले जातील. मुलींच्या शिक्षणासाठी ही मदत केली जाते.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार

लेक लाडकी या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. ज्या नागरिकांकडे ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाचे उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार आहे. जर तुम्हाला जुळ्या मुली असतील तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT