Ration Card: उरले शेवटचे ५ दिवस! आताच हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद

Ration Card KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांना केवायसी करणे गरजेचे आहे. रेशन कार्ड केवायसी केले नाही तर तुमचे कार्ड बंद होणार आहे.
Ration Card KYC
Ration CardSaam Tv
Published On

Ration Card: भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डद्वारे गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य दिले जाते. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किंमतीत अन्नधान्य मिळावेत, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.रेशन कार्धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहेत. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२५ आहे.

Ration Card KYC
LIC Scheme: एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा; LIC ची जबरदस्त योजना

रेशन कार्ड केवायसी (Ration card kyc)

रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. याआधी ३१ मार्चपर्यंत तुम्ही केवायसी करु शकत होत्या. ही तारीख वाढवण्यात आली आहे. परंतु तुम्ही अजूनही जर केवायसी केले नसेल तर तुम्ही लगेच करा.

या रेशनधारकांना मिळणार नाही मोफत धान्य

रेशन कार्डधारक रेशन दुकानावर जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. फक्त ज्या लोकांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्यथा या योजनेचा लाभ बंद होणार आहे. केवायसी न केलेल्या नागरिकांचे रेशन कार्डवरुन नाव काढण्यात येणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. शेवटचे ५ दिवस उरले आहेत. त्याआधी तुम्ही रेशन कार्ड केवायसी करा.

Ration Card KYC
Ration Card KYC: कामाची बातमी! १५ दिवसांत हे काम कराच, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

केवायसी ऑनलाइन पद्धतीने कसं करावं? (Ration Card KYC Online Process)

सर्वप्रथम तुम्हाला Aadhaar FaceRD अॅप डाउनलोड करायचा आहे.

यानंतर तुमचे लोकेशन टाकायचे आहेत.

यानंतर आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाका.

यानंतर तुम्हाला face-e-kyc ऑप्शन निवडा.

यानंतर तुमचा फोटो अपलोड होईल.

यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

ऑफलाइन पद्धतीने तुम्ही जवळच्या रेशन दुकानात जाऊनदेखील रेशन कार्ड केवायसी करु शकतात. यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत न्यावे लागेल.

Ration Card KYC
E Shram Scheme: कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळते ३००० रुपयांनी पेन्शन; फक्त 'हे' काम करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com