यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. देशासाठी काहीतरी करण्यासाठी अनेकजण चांगल्या पगाराची नोकरी सोडतात अन् स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. असंच काहीसं आयपीएम अनुकृति शर्मा (IPS Anukruti Sharma) यांनी केलं. त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी अमेरिकन एजन्सी नासामधील नोकरी सोडली.
अनुकृति शर्मा या २०२० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण जयपूरमधील इंडो भारत इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर त्यांनी कोलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमधून बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन अँड सर्जरी (BSMS) डिग्री प्राप्त केली आहे.
अनुकृति यांनी पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांची ओळख वैभव मिश्रा यांच्याशी झाली. त्या दोघांची निवड ह्यूस्टनमधील टेक्सास येथील एका युनिव्हर्सिटीमध्ये झाली. या दोघांच्या कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्यास सांगितले.
.
अनुकृति या पीएचडी करत असतानाच त्यांना अमेरिकेत नोकरी करण्याची संधी मिळाली. त्यांची नासामध्ये निवड झाली. हे दोघेही लाखो रुपये कमवत होते. परंतु अनुकृति पुन्हा मायदेशी परतल्या. त्यांनी (NET) ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) परीक्षेत २३ रँक मिळवली.
यानंतर अनुकृति यांनी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणि त्यांचे पती वैभव यांनी बनारसमध्ये राहून सिव्हिल सर्व्हिसची तयारी सुरु केली.या दोघांनी एकमेकांची खूप साथ दिली.
अनुकृति आणि त्यांचे पती वैभव मिश्रा यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली. अनुकृति यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. दुसऱ्या प्रयत्नातदेखील त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. तिसऱ्या अटेंम्पटमध्ये त्या इंटरव्ह्यू राउंडपर्यंत पोहचल्या होत्या. मात्र, त्यांचे सिलेक्शन झाले नाही.
२०१८ मध्ये अनुकृति यांनी ३५५ रँक प्राप्त केली. त्यांची आयआरएस पदी निवड झाली. परंतु त्यांना आयपीएस बनायचे होते. त्यामुळे २०२० मध्ये त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांना यश मिळाले आणि त्या आयपीएस झाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.