प्रत्येकाचे आयुष्यात काही न काही बनण्याचे स्वप्न असते. अनेक पालकांना आपल्या मुलाने मोठे होऊ सरकारी नोकरी करावी, असे वाटत असते. अनेकांची आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा असते. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा क्रॅक करणे खूप कठीण असते. अनेकजण पहिल्याच प्रयत्नात परीक्षा क्रॅक करतात. काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु तरीही प्रयत्न केल्यावर यश मिळतेच. असंच यश जागृती अवस्थी यांना मिळालं आहे. (Success Story Of IAS Jagruti Awasthi)
जागृती अवस्थी यांनी इंजिनियरिंग केले होते. त्यानंतर भेल या सरकारी कंपनीत ऑफिसर म्हणून कार्यरतदेखील होत्या. पहिल्या प्रयत्नात त्यांनी अपयश मिळालं. परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक २ प्राप्त केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
जागृती या मूळच्या भोपाळच्या रहिवासी. त्यांचे वडील डॉ. सुरेश चंद्र अवस्थी भोपाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेर आहेत. जागृती यांनी भोपाळमधून २०१० साली शालेय शिक्षण पूर्ण केले. २०१२ मध्ये इंटमीडिएट शिक्षण पूर्ण केले. जागृती यांनी मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी GATE परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी सरकारी कंपनीत नोकरी केली. (Success Story)
२०१९ मध्ये त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीची तयारी सुरु केली. यासाठी त्यांनी दिल्लीत एका कोचिंग क्लासेसमध्ये अॅडमिशनदेखील घेतले होते. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनमुळे त्यांना भोपाळला परत यावे लागले. (Success Story Of IAS)
कोरोना काळातही त्यांनी अभ्यास केला. त्यांनी ऑनलाइन क्लासेसद्वारे अभ्यास केला. मुलीचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनीही त्यांना खूप मदत केली. मुलीला मदत करण्यासाठी त्यांच्या आईने शिक्षिकेची नोकरी सोडली. त्यांनी चार वर्षे घरात टीव्हीदेखील लावला नव्हता. त्यामुळेच त्यांनी खूप प्रयत्न केले.
पहिल्या प्रयत्नात जागृती यांना अपयश आले. तरीही त्या डगमगल्या नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. यूपीएससी २०२० मध्ये त्यांनी २ रँक प्राप्त केली.जागृती यांनी त्यांच्या आईवडिलांचे नाव मोठे केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.