Gold Silver Price Saam tv
बिझनेस

Gold Silver Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव घसरले ! स्वस्तात खरेदी करा सोने-चांदी, तपासा आजचे दर

Today 10th July Gold Price In Maharashtra : आज सोमवारी सकाळी एमसीएक्सवर सोने आणि चांदी दोघांचे भाव कमी किंमतीत उघडले आहे.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. मागच्या तीन आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढले आहेत. परंतु, आज सोन्याच्या दरात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

आज सोमवारी सकाळी एमसीएक्सवर सोने आणि चांदी दोघांचे भाव कमी किंमतीत उघडले आहे. सोन्याचा दर घसरल्याने तो ५८ हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर सोन्याचे दर 104 रुपयांच्या घसरणीसह 58,739 रुपयांवर उघडले. त्याचवेळी एमसीएक्स एक्सचेंजवर चांदी 130 रुपयांच्या घसरणीसह 71,284 रुपयांवर उघडली. परंतु काही वेळानंतर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता देखील आहे.

1. आजच्या सोन्याचा भाव

एमसीएक्सवर सोने 102 रुपयांच्या (Money) घसरणीसह 58739 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले आहे परंतु, गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 54,700 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,320 रुपये मोजावे लागले आहे. अशातच सध्या बाजारात सोन्याचे भाव हे स्थिर पाहायला मिळत आहे.

2. चांदीचा भाव

सोमवारी एमसीएक्स एक्सचेंजवर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोमवारी सकाळी 9.30 वाजता चांदीचा भाव 119 रुपयांनी घसरून 71284 रुपये प्रति किलोवर उघडला. चांदीचा दरही व्यापार सत्रात 71284 रुपये प्रति किलोवर पोहोचला. परंतु, , गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार आज सोन्याचा भाव हा १० ग्रॅमसाठी 733 रुपयांनी मोजावे लागेल.

3. भावात कशी होते बदल ?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कमी झाले असले तरी अद्यापह भारतीय सराफ बाजारात सोन्याला उतरती कळा सुरु झाली नाही. पंरतु, अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात सोन्या-चांदीचे दर कमी होतील.

4. तुमच्या शहरात सोन्याचा दर किती ?

आज २४ कॅरेटसाठी मुंबईत (Mumbai) ५९,५१० रुपये, दिल्लीत ५९,६६० तर पुण्यात ५९,५१० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT