

सप्तशृंगी गडावरून परतताना नंदुरबारच्या तरुणाचा मृत्यू
कळवण देवळा रस्त्यावर दुचाकीला मॅक्सिमो वाहनाची धडक
सप्तशृंगी देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या तरुणांचा भीषण अपघात
सागर निकवाडे, साम प्रतिनिधी
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. कळवण-देवळा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला मॅक्सिमो वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. सचिन वसावे असं मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर विश्वजीत वसावे हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोन्ही तरुण नंदुरबार येथील आहेत. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
जखमी झालेला विश्वजीत वसावे याला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास तब्बल एक तास उशीर झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी आणि मित्रांनी केलाय. कळवण पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरूय.
मिळालेल्या माहितीनुसार कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सचिन वसावे आणि विश्वजीत वसावे हे दोघे मित्र सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन दुचाकीने परतत असताना कळवण-देवळा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला मॅक्सिमो वाहनाने समोरून धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती दुचाकीवरील सचिन वसावे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विश्वजीत वसावे, रा. धानोरा, हा गंभीर जखमी झाला.
या अपघातप्रकरणी कळवण पोलिसांनी मॅक्सिमो वाहनचालकाला ताब्यात घेतलंय. अपघाताबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.