अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

Kenya Bus And Truck Accident Kills 22 People: केन्यामध्ये अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या प्रवाशांच्या बसला ट्रकची जोरदार धडक बसली. भीषण अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.
KENYA BUS-TRUCK ACCIDENT
KENYA BUS-TRUCK ACCIDENTsaam tv
Published On: 

केन्यामध्ये रविवारी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती माकुएनी काऊंटचे आयुक्त अब्दुल्लाही खलीफ यांनी दिली आहे. हे सर्व प्रवासी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमावरून परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

KENYA BUS-TRUCK ACCIDENT
निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी केन्यामधील प्रमुख महामार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात किमान २२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच महामार्गावर तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या दुसऱ्या एका अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला होता. हा महामार्ग केन्याची राजधानी नैरोबीला किनारपट्टीवरील मोम्बासा शहराशी जोडतो.

अंत्यसंस्कारावरून परतताना काळाचा घाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हा अपघात झाला. बसमधील प्रवासी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमावरून परतत असताना ही दुर्घटना घडली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

KENYA BUS-TRUCK ACCIDENT
140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

माकुएनी काउंटीचे आयुक्त अब्दुल्लाही खलीफ यांनी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. केन्यामध्ये रस्ते अपघातांसाठी अतिवेग आणि रस्त्यांची खराब स्थिती ही प्रमुख कारणे मानली जातात. या अपघातानंतरचे व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com