जादूटोणा, करणी, भानामती असे अंधश्रद्धाचे प्रकार ग्रामीण भागात अजूनही आढळून येतात. कोणाला तरी इजा पोहचण्यासाठी, किंवा कधी संपत्तीचा वाद तर कधी निवडणुकीत विजयासाठी प्रतिस्पर्ध्यावर जादूटोणा केला जाण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवर काळी जादू करण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडलाय. शरयू नदीच्या काठावरील मुक्तिधाम येथील स्मशानभूमीजवळ हा धक्कादायक प्रकार घडलाय. मोदींच्या चित्राशेजारी सुया टोचलेले लिंबू आणि लाल धाग्याने बांधलेले नारळ यांसारखे संशयास्पद साहित्य आढळल्याचं समजतंय. फोटोवर हळद-कुंकूही टाकलं आहे. जादूटोण्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील दोहरीघाट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. यामागे कोण आहे ? त्यांचा हेतू काय आहे ? याचा शोध घेतला जात आहे. काहींची पोलिसांनी चौकशीही सुरु केली आहे. यावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ही कृती आराजकता माजवणाऱ्यांनी केल्याचा आरोप करत अशा प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामाश्रय मौर्य यांनी केली आहे. वाराणसी हा पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच थेट पंतप्रधानांच्या फोटोवर जादूटोण्याचा प्रयत्न होणे हा गंभीर प्रकार आहे. चौकशीनंतर काय सत्य समोर येतंय ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.