Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price: सोन्याचे दर 60 हजारांच्या पार, चांदीच्या किमतीही गगनाला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Today's 27th July Gold Silver Rate In Maharashtra : आंतरारष्ट्रीय बाजारात गुंतवणूकीचे पर्याय वाढल्यामुळे सोन्या-चांदीचे दरात वाढ होताना दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra :

सोन्या आणि चांदीच्या किमती मागच्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते पण जुलै महिन्यात सोने-चांदीचे दर वधारले.

आंतरारष्ट्रीय बाजारात गुंतवणूकीचे पर्याय वाढल्यामुळे सोन्या-चांदीचे दरात वाढ होताना दिसून येत आहे. अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होऊ शकते असे वाटत असताना पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊया आजचा सोन्या-चांदीचा दर

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल २६ जुलैला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,320 रुपये मोजावे लागणार आहे. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,600 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,400 रुपये मोजावे लागत आहे. मागच्या भावानुसार आज २२ कॅरेटच्या भावात 300 रुपयांनी वाढ झाली तर २४ कॅरेटच्या भावात 80 रुपयांनी (Money) वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

ग्राहकांचा कल हा सोने-चांदी खरेदी करण्याकडे अधिक असतो. अशातच गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार २७ जुलैला चांदीच्या (silver) १० ग्रॅम भावासाठी 784 रुपये तर 1 किलो चांदीसाठी 78,400 रुपये मोजावे लागणार आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 60,870 रुपये

  • दिल्ली - 60,640 रुपये

  • हैदराबाद - 60,490 रुपये

  • कोलकाता - 60,490 रुपये

  • लखनऊ - 60,640 रुपये

  • मुंबई - 60,490 रुपये

  • नागपूर - 60,490 रुपये

  • पुणे - 60,490 रुपये

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT