Ladli Behna Yojana Saam Tv
बिझनेस

Ladli Behna Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! ₹१५०० आजपासून खात्यात येणार; ३१ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladli Behna Yojana 31st Installment Update: मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेअंतर्गत महिलांना आजपासून ३१ वा हप्ता मिळणार आहे. सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहेत.

Siddhi Hande

लाडली बहना योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

आजपासून महिलांना मिळणार १५०० रुपये

मध्य प्रदेश सरकारने केली घोषणा

महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडली बहना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आजपासून पैसे मिळणार आहे. मध्य प्रदेशमधील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आज १५०० रुपये मिळणार आहे.

लाडली बहना योजनेत आतापर्यंत ३० हप्ते जमा केले आहेत. त्यानंतर आज ३१ वा हप्ता दिला जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. सीएम मोहन यादव यांनी स्वतः एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय?

मुख्यमंत्री सीएम यादव यांनी म्हटलंय की, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ३१ व्या हप्त्याचे वितरण... ९ डिसेंबर २०२५ रोजी लाडली बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये जमा केले जाणार आहे. एकूण १.२६ कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.

याआधी देत होते १२५० रुपये

लाडली बहना योजनेत याआधी १२५० रुपये दिले जात होते. यानंतर आता या योजनेअंतर्गत निधी वाढवण्यात आला आहे. महिलांच्या खात्यात एकूण १५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. २५० रुपयांनी हप्ता वाढवण्यात आला आहे.

तुम्हाला पैसे मिळाले की नाही?

मध्य प्रदेश सरकारने ३१ वा हप्ता जारी केला आहे. मध्य प्रदेशमधील महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, तुम्हाला पैसे येणार की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला लाडली बहना योजनेच्या पोर्टलवर जाऊन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करायचं आहे. जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turichya Danyacha Zunka Recipe : जेवणाचा गावरान बेत; गरमागरम भाकरी अन् तुरीच्या दाण्याचा झुणका, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update : पुणे महानगरपालिकेत आंदेकर- कोमकर संघर्ष होणार

Gharoghari Matichya Chuli : जानकी अन् हृषीकेशच्या वर्तमानावर भूतकाळाचं सावट; नवा प्रोमो पाहून बसेल धक्का-VIDEO

भाजपच्या यादीतही घराणेशाहीचा डंका! वाचा कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांनी घराणेशाहीला प्राधान्य दिलं?

8th Pay Commission: आनंदाची बातमी! आजपासून आठवा वेतन आयोग लागू; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT