Nagpur: महिला कबड्डीपटूची आत्महत्या, व्हॉट्सअप मेसेजवरून धक्कादायक कारण समोर; नागपुरमध्ये खळबळ
Marathi -
नागपूरच्या सावनेरमध्ये महिला कबड्डीपटूने आत्महत्या केली
किरण दाढेने कीटकनाशक प्राशन करून केली आत्महत्या
नोकरीचे आमिष, वैवाहिक फसवणूक आणि मानसिक छळामुळे उचलले टोकाचे पाऊल
किरणच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल
पराग ढोबळे, नागपूर
नागपुरमध्ये महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याची घटना घडली. कीटकनाशक प्राशन करून कबड्डीपटूने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे नागपुरमध्ये खळबळ उडाली आहे. नागपुरच्या सावनेरमध्ये ही घटना घडली. आर्थिक अडचणी, नोकरीचे आमिष आणि लग्नात झालेली फसवणूक या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सावनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण सूरज दाढे असं आत्महत्या केलेल्या महिला कबड्डीपटूचे नाव होते. सावनेरच्या माळेगाव टाऊनमध्ये ती राहायला होती. आर्थिक अडचणीतून सुटका व्हावी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे महिला कबड्डीपटूने टोकाचा निर्णय घेतला. या कबड्डीपटूने कीटकनाशक प्राशन केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
स्वप्निल जयदेव लांबघरे असे आत्महत्या केलेल्या महिला कबड्डीपटूच्या नवऱ्याचे नाव असून तो सध्या फरार आहे. स्वप्निलने किरणची फसवणूक केली होती. सावनेर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. नोकरी लावून देण्याच्या आश्वासनावर २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने स्वप्निलने किरणसोबत लग्न केले होते. पण तरीही किरण ही माहेरी राहत असल्याचे बोललं जात होते.
स्वप्निलकडून वेकोलीत नोकरी लावून देण्याच्या विषयी टाळाटाळ, नातेसंबंधासाठी दबाव आणि मानसिक त्रास वाढला होता. मात्र नोकरी लावून देणे दूरच उलट धमक्या, शिवीगाळ केली जात होती. त्यामुळे किरणने कुटुंब न्यायालयात धाव घेत घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. स्वप्निलकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून - ४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास किरणने कीटकनाशक प्राशन केले.
उपचारासाठी तिला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचारादरम्यान ७ डिसेंबरला किरणचा मृत्यू झाला. किरणने स्वप्निलकडून त्रास वाढल्याने फोनमधील सर्व मेसेजेस पुराव्यासाठी जतन करून ठेवल्याची माहिती आहे. याच आधारे पोलिसांनी स्वप्निलविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

