

पोस्टाची खास पब्लिक प्रोव्हिडंट फंड
योजनेत मिळणार १.०३ कोटी रुपये
दर महिन्याला फक्त व्याजातून मिळतील ६१ हजार रुपये
प्रत्येकजण आपल्या उज्जवल भविष्यासाठी दर महिन्याच्या पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. दरम्यान, ही रक्कम जर तुम्ही एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. या गुंतवणूकीमुळे तुम्ही करोडपती होऊ शकतात. या योजनेत तुम्हाला सतत पैसे जमा करावे लागतील. जेणेकरुन मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्याजवळ चांगली रक्कम जमा होईल.
२५ वर्षांसाठी गुंतवणूक
पीपीएफमधील गुंतवणूकीसाठी तुम्हाला 15+5+5 फॉर्म्युला वापरु शकतात. या योजनेत तुम्हाला २५ वर्षात १.०३ कोटी रुपये मिळतील. या योजनेतून मिळणाऱ्या व्याजातून तुम्हाला दर महिन्याला ६१ हजार रुपये मिळतील.
पीपीएफ योजनेत सध्या ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत आयकर कलम 80Cअंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स सूट मिळते.
पीएफ योजनेची मॅच्युरिटी १५ वर्षात पूर्ण होते. परंतु तुम्ही ५-५ वर्षांसाठी गुंतवणूकीचा कालावधी वाढवू शकतात.म्हणजेच तुम्ही एकूण २५ वर्ष या योजनेत गुंतवणूक करु शकतात.
या योजनेत जर तुम्ही पहिल्या १५ वर्षात १.५ लाख रुपये दरवर्षी जमा केले तर तुम्ही २२.५ लाख रुपये गुंतवणार आहे. यावर तुम्हाला १८.१८ लाख रुपयांचे व्याज मिळेल.यावर तुम्हाला पुढच्या ५ वर्षात म्हणून एकूण २० वर्ष पुर्ण झाल्यानंतर ५७.३२ लाख रुपये जमा होतील. यावर तुम्हाला १६.६४ लाख रुपये व्याज मिळणार आहे.
२५ वर्षांसाठी तुमच्या खात्यात एकूण ८०.७७ लाख रुपये जमा असणार आहेत. यामध्ये जर तुम्ही अजून १० वर्षांसाठी १.५ लाख रुपये दरवर्षी गुंतवले तर १.०३ कोटी रुपये मिळतील. २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही पैसे तसेच ठेवले तर तुम्हाला व्याज मिळते. तुम्हाला जवळपास व्याजातून ७.३१ लाख रुपये मिळणार आहे. याचाच अर्थ असा की , तुम्हाला महिन्याला ६०,९४१ रुपये मिळू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.