Ladki Sunbai Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Ladki Sunbai Yojana News: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सुनबाई योजना राबवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवण्यात आली आहे.

Siddhi Hande

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली आहे. या योजनेचा राज्यातील तब्बल अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सुनबाई योजना सुरु केली आहे. शिंदे गटाने ही योजना राबवली आहे. ही योजना नक्की काय आहे? या योजनेचा फायदा कोणाला होणार? या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

काय आहे लाडकी सूनबाई योजना? (What Is Ladki Sunbai Yojana)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही योजना राबवली आहे. काय या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत महिलांना जर कोणती मदत हवी असेल तर ती मिळणार आहे. महिलांना जर कोणता त्रास होत असेल तर त्या हेल्पलाइन नंबरवरुन फोन करु शकणार आहेत. त्यांच्या समस्येचं निवारण केले जाईल.

लाडकी सूनबाई योजनेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येक शाखेमधून आणि विभागीय कार्यालयातून मदत केली जाणार आहे. तसेच त्या त्या विभागासाठी हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहे.

जर घरातील कोणत्याही स्त्रीवर अन्याय किंवा अत्याचार होत असेल तर त्यांना मदत केली जाणार आहे. महिलांनी या हेल्पलाइन नंबरवर फोन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मदत केली जाणार आहे.त्यामुळे महिलांना भविष्यात या योजनेचा खूप फायदा होणार आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना मदत केली जाणार आहे.

याआधी राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते.दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. त्यानंतर आता महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन योजना राबवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला, ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं, नाही तर होतील गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज मंगळवेढा शहरात कडकडीत बंद

Beauty Tips : चेहरा उजळ पण मान काळी? मानेला उजळण्यासाठी करून पाहा हे ७ घरगुती उपाय

Heart warning signs at night: रात्री झोपण्यापूर्वी ही 4 लक्षणं दिसली तर झोपेत हार्ट अटॅक येतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT